Ambad Accident : दुचाकींच्या अपघातात एक ठार, दोघे गंभीर; अंबड-पाचोड मार्गावरील चिंचखेड फाट्याजवळील घटना
Accident News : अंबड-पाचोड मार्गावर चिंचखेड फाट्याजवळ दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात शरद वाघुंडे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे दोन सहकारी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंबड : अंबड-पाचोड मार्गावरील चिंचखेड फाट्याजवळ शनिवारी (ता. सात) दुपारी साडेचारच्या सुमारास झालेल्या दुचाकींच्या अपघातात एक ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले.