ट्रकखाली दबून एक दुचाकीस्वार ठार

राजेंद्र भाेसले
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

मालवाहतूक करणारा ट्रक उलटून दुचाकीवरील एकजण ठार, तर दोघे जखमी झाले. ही घटना अंधानेर (ता. कन्नड) फाट्याजवळ गुरुवारी (ता. आठ) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

कन्नड, ता. 8 (बातमीदार) ः मालवाहतूक करणारा ट्रक उलटून दुचाकीवरील एकजण ठार, तर दोघे जखमी झाले. ही घटना अंधानेर (ता. कन्नड) फाट्याजवळ गुरुवारी (ता. आठ) दुपारी अडीचच्या सुमारास घडली.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रक (एचआर-38, एस-6008) उलटल्याने दुचाकीवरून जाणारे जगीराम प्रसाद परशुराम प्रसाद (रा. सोकीतार, जि. बलिया, उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम कळंकी) यांच्यासह अन्य दोघेजण ट्रकखाली दबले गेल्याने जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती गंभीर आसल्याने पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबादेतील "घाटी' रुग्णालयात नेण्यात आले.

उपचारादरम्यान जगीराम प्रसाद (वय 40) यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया शहर पोलिस ठाण्यात सुरू होती. सदर घटनेचा तपास फौजदार एस. बी. जाधव करीत आहेत. जगिराम प्रसाद हे रस्त्याच्या बाजूला असलेल्या बीएसएनएल कंपनीच्या केबलचे काम करीत असून, कळकी येथे वास्तव्यास होते. ते कळंकीकडे जाताना हा अपघात झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one died in accident