esakal | भरधाव कार पुलाखाली गेल्याने एक जण ठार, लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

भरधाव कार पुलाखाली गेल्यामुळे झालेल्या अपघातात एक ठार, तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (ता.आठ) दुपारी दोनच्या सुमारास लातूर-अंबाजोगाई महामार्गावर गरसुळी पाटीजवळ हा अपघात घडला आहे.

भरधाव कार पुलाखाली गेल्याने एक जण ठार, लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील घटना

sakal_logo
By
शिवकुमार निर्मळे

अंबाजोगाई (जि.बीड) : भरधाव कार पुलाखाली गेल्यामुळे झालेल्या अपघातात एक ठार, तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (ता.आठ) दुपारी दोनच्या सुमारास लातूर-अंबाजोगाई महामार्गावर गरसुळी पाटीजवळ हा अपघात घडला आहे. औरंगाबादचे रहिवासी प्रभाकर कस्तुरे ( वय ४९) हे कारने (एमएच २० बीव्ही ६८४५) लातूरहून औरंगाबादकडे निघाले होते.

चोरट्यांनी फोडले जमादाराचे घर, दागीन्यांसह रोख रक्कम लांबविली! 

गरुसुळीपाटीजवळ चालक अशोक लाखे (रा.औरंगाबाद) यांचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला येत पुलाखाली जाऊन कठड्याला धडकली. या अपघातात प्रभाकर कस्तूरे यांचा जागीच मृत्यू झाला. चालक अशोक लाखे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच बर्दापूर येथील पोलिस घटनास्थळी पोचले. त्यांनी जखमींना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयाकडे रवाना केले.

ऑलिंपियाड परीक्षेत शिवम सिरसाटचे यश
योगेश्वरी नूतन विद्यालयाचा विद्यार्थी शिवम लहू सिरसाट याने राष्ट्रीय सायन्स ऑलिंपियाड परीक्षेत गुणवत्ता यादीत यश संपादन केले. त्याला सहशिक्षिका शिल्पा थोरात यांनी मार्गदर्शन केले. त्याच्या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी डॉ. सुरेश खुरसाले, अॅड. शिवाजीराव कराड, कमलाकरराव चौसाळकर, गणपत व्यास, प्रा.माणिकराव लोमटे, शाळेचे पदाधिकारी कुंदा व्यास, अलका साळूंके, एस. के. निर्मळे, अपर्णा पाठक, विलास गायकवाड, एस.बी.शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

संपादन - गणेश पिटेकर