esakal | नगर-आष्टी मार्गावर भीषण अपघात, एक ठार अन् चार गंभीर जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

आष्टी (जि.बीड) : अहमदनगर-आष्टी मार्गावर कार आणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाले.

नगर-आष्टी मार्गावर भीषण अपघात, एक ठार अन् चार गंभीर जखमी

sakal_logo
By
निसार शेख

आष्टी (जि.बीड) : अहमदनगर-आष्टी मार्गावर कार आणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात (Accident In Beed) एक जण ठार, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना  मंगळवारी (ता.१४) रात्री १० वाजण्याच्या सुमारास धानोरा परिसरातील बाळेवाडी फाट्याजवळ घडली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांना जेसीबीच्या मदतीने वेगळे करावे लागले. जखमींना अहमदनगर (Ahmednagar) येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कैसरअली अजहरअली खान (रा.मुंबई) हे बीड येथून मुंबई (Mumbai) येथे मंगळवारी (ता.१४) रात्री १० वाजण्याच्या सुमारास पिकअपने जात होते, तर डॉ व्यंकटेश नारायण बोराटे हे कारने (रा.मुर्षदपूर,आष्टी, हल्ली मुक्काम वैद्यकीय कॉलनी, भिंगार, अहमदनगर) हे अहमदनगर येथून आष्टीकडे येत होते. दोन्ही वाहने धानोरा परिसरातील बाळेवाडी फाटानजीक (Ashti) येताच दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.

हेही वाचा: औरंगाबादेत ओबीसी आरक्षणासाठी भाजपचा रास्ता रोको, आंदोलक ताब्यात

यामध्ये डॉ. व्यंकटेश बोराटे यांचा जागीच मृत्यू झाला असून पिकअप चालक कैसरअली अझहरअली खान, मोहम्मद असिफ मो युसुफ शेख, मोहम्मद तारीक मो चौधरी, हरून नबाब सय्यद (सर्व रा.मुंबई) हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती अंभोरा पोलिसांना समजताच घटनास्थळी अंभोरा पोलिसांनी धाव घेतली. अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांना जेसीबीच्या साहाय्याने वेगळे करावे लागले. या भीषण अपघातामुळे अहमदनगर-आष्टी मार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागून वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. यावेळी अंभोरा पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार खंडेराव थोरात, पोलिस शिपाई राजाराम कांबळे, अजय बोडखे, पोलिस नाईक रवी राऊत, तुषार वामन यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत करून वाहतूक सुरळीत केली.

loading image
go to top