राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलक अंगावर पडून नामवंत मृदंग वादकाचा दुर्दैवी अंत; आध्यात्मिक क्षेत्रात हळहळ

ज्ञानेश्वर साके हे आज (शनिवार) एमएच 20 बीएच 7701 क्रमांकाच्या मोटरसायकल वरून अहमदपूरकडून आपल्या गावी जात होते.
National Highway Accident
National Highway Accidentesakal
Summary

ज्ञानेश्वर बालाजी साके हे चाकूर तालुक्यातील नामवंत मृदंग वादक असून त्यांनी शेकडो धार्मिक कार्यक्रमात मृदंग वाजवण्याचे काम केले होते.

अहमदपूर : तालुक्यातील महादेववाडी (Mahadevwadi) जवळ राष्ट्रीय महामार्ग (National Highway Accident) क्रमांक 361 वरील दिशादर्शक फलक अंगावर पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. चाकूर तालुक्यातील आष्टा येथील ज्ञानेश्वर बालाजी साके (वय 29) हे आज (शनिवार) एमएच 20 बीएच 7701 क्रमांकाच्या मोटरसायकल वरून दुपारी पाचच्या सुमारास अहमदपूरकडून आपल्या गावी जात होते.

याच वेळी महादेववाडी परिसरात जोराच्या वाऱ्यासह पाऊस चालू झाला. दरम्यान, अहमदपूर तालुक्यातील महादेववाडी पाठीजवळ ज्ञानेश्वर साके पोचले असता वादळी वाऱ्यामुळे महामार्गावर लावलेला दिशादर्शक नाम फलक अंगावर पडला व त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

National Highway Accident
Paschim Railway : पश्चिम रेल्वेवर फुकटे वाढले! दोन महिन्यात तब्बल 38 कोटी 3 लाखांचा दंड वसूल

हा दिशादर्शक फलक अचानक कोसळल्याने याच वेळी शिरूर ताजबंदकडे जाणाऱ्या एका महिंद्रा बोलेरो जीप व एका कारचे नुकसान झाले आहे. ज्ञानेश्वर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. या सदर घटनेची अहमदपूर पोलिसात नोंद करण्याची प्रकिया चालू आहे.

आध्यात्मिक क्षेत्रात हळहळ

ज्ञानेश्वर बालाजी साके हे चाकूर तालुक्यातील नामवंत मृदंग वादक असून त्यांनी शेकडो धार्मिक कार्यक्रमात मृदंग वाजवण्याचे काम केले होते. या उत्कृष्ट मृदंग वादकाच्या अचानक झालेल्या अपघाती निधनाने आध्यात्मिक क्षेत्रातील लोक हळहळ करत आहे.

..तर जीव वाचला असता!

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर सहसा चार चाकी व दोन चाकी वाहने गतीने जातात. एक क्षण मिळाला असता तर ज्ञानेश्वर साके यांची मोटरसायकल दिशादर्शक फलक पडण्याच्या ठिकाणापासून एक सेकंदात पुढे गेली असती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com