esakal | परभणीत शिवभोजन थाळीस एक महिन्याची मुदतवाढ- मंजुषा मुथा
sakal

बोलून बातमी शोधा

परभणी शिवभोजन

परभणीत शिवभोजन थाळीस एक महिन्याची मुदतवाढ- मंजुषा मुथा

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः ब्रेक दी चेन अंतर्गत शिवभोजन थाळी एक महिना नि: शुल्क उपलब्ध करुन देण्यात आली होती. परंतू आता ता. 15 मेपासून पुढील एक महिन्याच्या कालावधीसाठी शिवभोजन थाळी लाभार्थ्यांना नि: शुल्क उपलब्ध करुन देण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यात कोरोना संसर्गामुळे निर्बंध लागू केलेले आहेत. यामुळे सर्व उद्योग, व्यवसाय बंद असल्या कारणाने अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला आहे. त्यामुळे हातावर पोट असणारे व गरजु लोकांना वेळीच जेवण मिळावे यासाठी शिवभोजन योजनेतंर्गत जिल्ह्यातील परभणीसह इतर आठही तालुक्याच्या ठिकाणी शिवभोजन केंद्र उभारण्यात आली आहेत. या केंद्राच्या माध्यमातून एकवेळचे मोफत जेवण दिले जात आहे. याचा लाभ गरजू लोकांना मोठ्या प्रमाणात होतांना दिसतो. परभणी जिल्ह्यात आगामी काळातही लोकांच्या हाताला काम राहणार नसल्याने परत एकदा एक महिण्यासाठी शिवभोजन योजनेतंर्गत मोफत जेवणास मुदत वाढ दिली आहे. विशेष म्हणजे सर्वच केंद्राच्या इष्टांकात वाढ देखील केली आहे. तब्बल दीडपटीने शिवभोजनच्या मोफत थाल्या वाटप करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मंजुषा मुथा यांनी दिली आहे.

हेही वाचा - हिंगोली गेट उड्डाण पुलाच्या मध्यभागी दुचाकी येताच पाठीमागून एका दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी बोरलेवार यांना पिस्तुलचा धाक दाखवून त्यांच्या जवळील 14 लाख 80 हजार रुपये रकमेची बॅग जबरीने काढून घेऊन पळून गेले होते.

तालुका केंद्र इष्टांक वाढीव इष्टांक

परभणी बालाजी रेस्टॉरंट २७५ ४१३

परभणी गायत्री उपहारगृह २७५ ४१३

परभणी जिल्हा रुग्णालय २७५ ४१३

गंगाखेड राधोगोविंद उडपी १५० २२५

सेलू शिवशंकर हॉटेल ७५ ११२

जिंतूर जगदंब उपहारगृह ७५ ११२

पूर्णा अभिरुची भोजनालय ७५ ११३

सोनपेठ श्रीदत्तकृपा भोजनालय ७५ ११२

पालम माऊलीकृपा भोजनालय ७५ ११२

पाथरी जयसेवालाल संस्था ७५ ११२

मानवत ज्ञानज्योती बचत गट ७५ ११३

एकूण मोफत थाली १,५०० २,२५०

राज्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने सर्वत्र निर्बंध आहेत. त्यामुळे गोरगरीब व गरजु लोकांची भोजनाची व्यवस्था व्हावी यासाठी शिवभोजन थालीचा जिल्ह्यातील इष्टांक वाढविण्यात आलेला आहे. तसेच या योजनेस मुदतवाड ही देण्यात आली आहे. या योजनेचा गरजु नागरीकांनी लाभ घ्यावा.

- मंजुषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी, परभणी

संपादन- प्रल्हाद कांबळे