विवाहितेसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे, गेला तुरुंगात

सुषेन जाधव
Tuesday, 15 October 2019

औरंगाबाद येथील प्रकरण

औरंगाबाद - घरी कोणी नसल्याची संधी साधत कपडे सुकवण्यासाठी गच्चीवर गेलेल्या 23 वर्षीय विवाहितेशी अश्‍लिल चाळे कळणाऱ्या नातेवाईक शिक्षकाला एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी धनश्री भंडारी यांनी ठोठाविली. रूपेश दीपक तारडे (25, रा. व्यंकटेशनगर, पिसादेवी रोड) असे आरोपीचे नाव आहे. 

प्रकरणात 23 वर्षीय पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडिता ही लहान भाऊ व पती यांच्यासह राहते. आरोपी रूपेश हा पीडितेचा नातेवाईक आहे. आरोपी हा पिडितेकडे नेहमी वाईट नजरेने पाहत असायचा. त्यामुळे पीडितेने त्याला समजावून सांगितले होते. दरम्यान, 13 मार्च 2017 ला होळी सण असल्याने पीडितेचा पती हा होळी खेळण्यासाठी बाहेर गेला होता. तर पीडितेचा भाऊदेखील सणानिमित्त गावी गेला होता.

पीडिता एकटी घरी होती, ती गच्चीवर कपडे सुकवण्यासाठी गेली असता आरोपी तेथे आला. त्याने पीडिता एकटी असल्याची संधी साधत गच्चीचा दरवाजा बंद केला व पीडितेशी अंगलट केली. त्यानंतर आरोपीने बेडरुममध्ये आणून तिथेही अश्‍लिल कृत्य केले. पीडितेचा पती घरी आल्यानंतर पीडितेने सर्व घटना पतीला सांगितली. प्रकरणात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याच्या सुनावणीवेळी सरकारी वकीलांनी तीन साक्षीदारांचे जबाब नोंदविले. दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपी रुपेशला एक वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठाविली. प्रकरणात पैरवी अधिकारी हवालदार एस.व्ही. चौधरी यांनी काम पाहिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Year imprisonment to Teacher