घरी जायची ओढ लागली मग, ‘या’ लिंकवर अर्ज करा

file photo
file photo

परभणी : लॉकडाउनमुळे परराज्यात किंवा परजिल्ह्यात अडकून पडलेल्या विद्यार्थी, कामगार व इतर व्यक्तींना आता त्यांचे घर जवळ करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे एका ऑनलाईन अर्जाद्वारे त्याची परवानगी मागावी लागणार आहे. परभणी जिल्ह्यात परत येण्यासाठी आपली माहिती जिल्हा प्रशासनाकडे भरण्यासाठी ॲनलाईन लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोरोना विषाणुच्या संसर्गानंतर देशात लॉकडाउन करण्यात आले होते. त्यामुळे देशातील वाहतुक व्यवस्था पूर्णत: बंद करण्यात आली आहे. तसेच जिल्हाबंदी केल्यामुळे बाहेर जिल्ह्यातून कोणताही व्यक्ती जिल्हयात प्रवेश करू शकत नव्हता. त्यामुळे अनेक ठिकाणी लोक अडकून पडले होते. कुणी परराज्यात होते तर कुणी पर जिल्ह्यात आपल्या माणसापासून दुर राहत होते. देशावर आलेल्या या संकट प्रसंगी आपल्या कुटूंबापासून दुर राहणाऱ्यांचे मोठे हाल झाले. परंतू, बऱ्याच ठिकाणी प्रशासनाने अश्या लोकांची व्यवस्था केली होती. परजिल्ह्यातील परभणी जिल्ह्यात अडकून पडलेले मजूर, कामगार, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींना त्यांच्या राज्यात अथवा जिल्ह्यात जाऊ देण्यासंदर्भात केंद्र आणि राज्य शासनाने नुकतेच आदेश निर्गमित करून मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती पाऊलं उचलली आहेत. बाहेर जिल्हा आणि राज्यात जाऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींच्या अर्जाच्या छाननी करून त्यांना पासेस तयार करून देण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या आदेशानुसार निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्या पथकाने काम सुरु केले आहे.

अर्ज करण्यासाठी ‘या’ आहेत लिंक
परभणी जिल्ह्यात अडकलेले व ज्या लोकांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी हवी असल्यास त्यांनी (https://covid१९.mhpolice.in/) या लिंकवर क्लिक करून आवश्यक माहिती भरावी.

असे लागतील कागदपत्रे 
१)  नजीकच्या काळातील स्पष्ट फोटो (File Size २०० kb पर्यंत)
२) नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक (Registered Medical Practitioner) यांचे कुठल्याही फ्लू सदृश्य आजार नसल्याचे प्रमाणपत्र 
३)आपल्या पत्त्याचा पुरावा किंवा आधारकार्ड (File size ५०० KB  पर्यंत)

अधिक माहितीसाठी संपर्क करा
८६९८८३०७६१
८६००८४७०३७
७०२०६५८५४५
०२४५२-२३३३८३
egsdycoll.par_mh@gov.in


इच्छुकांनी अर्ज करावा
परभणी जिल्ह्यातील ज्या व्यक्ती इतर जिल्ह्यात किंवा इतर राज्यात अडकलेले आणि परभणी जिल्ह्यात येण्यासाठी इच्छुक असलेले यांनी त्या-त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किंवा पोलिस आयुक्त यांच्याकडे अर्ज करावा.
- अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी परभणी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com