esakal | परभणी जिल्ह्यात आज काय काय घडले?, ते वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

परभणी जिल्ह्यामध्ये गुरुवारी किरकोळ कारणावरून एका युवकाचा खून करण्यात आला. तसेच जिंतूर शहरातील दोन कापड व्यापाऱ्यांवर तर पाथरीमध्ये दोन अवैधरीत्या गुटखा विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

परभणी जिल्ह्यात आज काय काय घडले?, ते वाचाच

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी : गंगाखेड शहरातील राजीव गांधीनगर येथील रहिवासी शेख गौस शेख नसीर (वय २५) याचा  गुरुवारी (ता.३० एप्रिल) रात्री आठ वाजता  धारदार शस्त्राने  खून करण्यात आला. तर याच घटनेत कलीम खान उस्मान खान व  सय्यद मुजम्मिल (रा.राजीव गांधी नगर) हे तरुण गंभीर जखमी झाले आहेत.

शहरातील राजीव गांधी नगर कॉर्नर वरील किराणा दुकानाजवळ गुरुवारी रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान मयत शेख गौस शेख नसीर (वय २५) तसेच कलीम खान उस्मान खान (वय २७) व सय्यद मुजम्मिल, सर्व राहणार राजीव गांधी नगर यांचे आरोपीशी किरकोळ कारणावरून वाद  झाला. या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. आरोपीने लोखंडी रॉड व चाकुने शेख गौस शेख नजीर, कलीम खान उस्मान खान, सय्यद मुजम्मिल यांच्यावर हल्ला केला. जखमींना तात्काळ उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे उपचारासाठी दाखल केले असता उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. हेमंत मुंडे यांनी शेख गौस शेख नजीर  यास मृत घोषित केले. 

हेही वाचा - परभणीत २२७ जणांना घराबाहेर पडणे पडले महागात

जखमी कलीम खान उस्मान खान व सय्यद मुजम्मिल यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथे पाठविण्यात आले. सय्यद मुजमील सय्यद दाऊद यांच्या फिर्यादीवरून गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये आरोपी भैय्यासाहेब रोहिदास जाधव, शैलेश संजय लोंढे, शेख अकबर शेख दिलावर, बबन पंडित, संजय पारवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
 

जिंतूरात दोन कापड व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल
शासनाचे आदेश धुडकावून कापड दुकाने चोरट्या मार्गाने सुरू ठेवल्याबद्दल दोन नामांकित कापड दुकानदारांवर जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पोलिस नायक बालाजी जाधव यांनी दिली. त्यात म्हटले की, गुरुवारी (ता. ३० एप्रिल) सकाळी दहा वाजता पेट्रोलिंग करीत असताना नंदकुमार बाबुराव चिद्रवार या नावाचे कापड दुकान चोरट्या मार्गाने कापड विक्री करीत होते.

हे देखील वाचाच परभणीकरांसाठी आनंदवार्ता : ‘त्या’ महिलेच्या संपर्कातील सर्वजण निगेटीव्ह

दुकानाचे मालक बिपिन नंदकुमार चिद्रवार तसेच त्यांच्या समोरचे बि.डी. कोकडवार यांचे कापड दुकानही चोरट्या मार्गाने सुरू होते. या दुकानाचे मालक मंदार मुकुंद कोकडवार या दोघांनीही शासनाचे आदेश डावलून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही, तसेच यापूर्वी त्यांना नोटीस बजावल्यानंतर देखील दुकाने सुरू ठेवल्याबद्दल दोन्ही व्यापा ऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाथरी शहरात लाखोंचा गुटखा जप्त
पाथरी शहरातील इंदिरा गांधीनगर व एकतानगरमध्ये राहणाऱ्या देव इसमाच्या घरावर शुक्रवारी (ता.एक मे) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एक लाख ९१ हजार ७०० रुपयांचा गुटखा जप्त केला.  या प्रकरणी दोन आरोपींवर पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, शुक्रवारी दोन इसम प्रतिबंधीत अन्न पदार्थ गुटख्याची विक्री करत असल्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांना माहिती मिळाली.

येथे क्लिक कराच - लाॅकडाऊनमध्ये आरोग्यमंत्री टोपेंनी उचललं महत्त्वाच पाऊल

त्यानुसार पथकाने छापा टाकून इंदिरा गांधी नगर येथील सय्यद समशेर सय्यद झहीर (रा. इंदिरागांधी नगर, पाथरी) यांच्या घरी पोत्यात असलेल्या गोवा गुटख्याचे प्रत्येकी ५२ पाकीटे ज्याची किमंत एक लाख ८७ हजार आहे. हा साठा जप्त करण्यात आला असून, एकता नगर येथील खय्युम खान रशिद खान (रा.एकता नगर, पाथरी) यांच्या राहत्या घरीही छापा मारून चार हजार ५०० रुपयांच्या गोवा गुटक्याची पाकीटे जप्त केली आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शरद विपट, पोलिस कर्मचारी सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, श्री.सावंत, श्री. फारुखी, शंकर गायकवाड, अरूण कांबळे यांनी केली.