कापूस विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी अनिवार्य 

file photo
file photo

परभणी : शासकीय कापूस खरेदी व बाजार समित्याच्या आवारातील दैनंदिन व्यवहार सुरु करण्यासाठी शासनाने सविस्तर सुचना दिलेल्या आहेत. त्यानुसार सीसीआय व कॉटन फेडरेशनच्या एफएक्यू दर्जाच्या कापूस खरेदीबाबत शेतकऱ्यांनी https : / / forms . gle VUASetva७aDqkGn३A या लिंकवर ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरावा. शेतमाल विक्रीसाठी आणण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.
 परभणी जिल्ह्यातील शासकीय खरेदी केंद्र व कृषि उत्पन्न बाजार समित्या मधील सर्व प्रकारचे दैनंदिन व्यवहार सुरु ठेवणेबाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी सस्था, परभणी/ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था/ प्र. विभागीय व्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित विभागीय कार्यालय परभणी, जिल्हा मार्केटिंग अधिकारी , परभणी,  सभापती व सचिव कृषि उत्पन्न बाजार समिती, भारतीय कपास निगम यांचे प्रतिनिधी, बाजार समितीचे व्यापारी संचालक, जिनिंग प्रेसिंग युनियनचे पदाधिकारी यांची सोमवारी (ता. २०) जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात सभा घेण्यात आली.  या वेळी ते बोलत होते.

फोटो अपलोड करणे अनिवार्य 
नोंदणी फॉर्म भरताना शेतकऱ्याजवळील कापसासोबत शेतकऱ्याचा ॲपद्वारे काढलेला फोटो अपलोड करणे अनिवार्य असणार आहे. त्या शिवाय शेतकऱ्यांनी केलेली नोंदणी ग्राह्य धरली जाणार नाही. सदरची खरेदी व नोंदणी फक्त परभणी जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकन्याकरिता कापूस खरेदीसाठीच राहील. सदरील नोंदणी ही ऑनलाईन अर्जाद्वारे केलेल्या नोंदणीचा डाटा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, परभणी या कार्यालयाकडून संबंधीत बाजार समितीला दिला जाईल व त्याप्रमाणेच बाजार समितीने शेतकऱ्यांना दूरध्वनीद्वारे / SMS वरून कापूस खरेदीस बोलवावे. इतर शेतमाल खरेदी संदर्भात बाजार समितीने दोन WhatsApp क्रमांक मेल आयडी वर्तमान पत्रामध्ये, आकाशवाणी आदी द्वारे जाहीर करावेत. 

टोकन देण्याचा निर्णय घ्यावा
संबंधित शेतकरी त्यांचा ७ / १२ , आधार कार्ड व कापसाचा फोटो नोट कॅम ॲपद्वारे घेऊन उपरोक्त नमूद WhatsApp वर - मेलवर पाठवतील. त्यानंतर फोन करून टोकन क्रमांक प्राप्त करुन घेतील. संबंधीत बाजार समितीने वरील प्रमाणे प्रथमत : विवस नोंदणी केल्यानंतर चौथ्या दिवसापासून कापूस तर सर्व प्रकारचा शेतमाल खरेदी - विक्रीसाठी आडते, जिनिंग, खरेदीवारांची संख्या पाहून शासन निर्देशाप्रमाणे कापसासाठी एका दिवशी कमाल २० वाहने किंवा बाजार समिती व खरेदी केंद्राच्या क्षमतेप्रमाणे टोकन देण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा. इतर शेतमालासाठी कमाल (१०) वाहनांना टोकन देण्यात यावे. 

सुरक्षीत अंतराचे पालन करावे
तथापी कोणत्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्व भूमीवर सोशल डिस्टन्स तर नियमावलीचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.  विक्रिसाठी कापूस आणताना शेतकऱ्याने त्यांचे सोबत ७ / १२ , आधार कार्ड बैंक पासबुक सोचत आणावे वरीलप्रमाणे गावाणी कलम टोकन क्रमांक घेतला आहे. अशा शेतकऱ्यानेच फक्त ज्या दिवशी बाजार समितीने बोलावले त्या दिवशी शेतमाल घेऊन बाजार समिती मध्ये, ज्यावेळेस प्रत्यक्ष शेतकरी शेतमाल कापाल त्यावेळस बाजार समिती गेटवर वर संबंधित शेतकऱ्यासबाजार  समितीचा शिक्का असलेले टोकन क्रमांकाची पावती यावी. ज्याच्या टोकन क्रमांकाची पावती शेतकरी बाजार समिती आवारात प्रवेश दोन वाहनातील अंतर किमान १० से १५ फूट राहील याची दक्षता घ्यावी., असेही जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com