esakal | गरजूंच्या मदतीसाठी संस्था, मित्रमंडळ सरसावले
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

खासदार संजय जाधव, आमदार बाबाजानी दुर्राणी, परिवर्तन विकास मित्र मंडळ, सोमेश्वर मित्र मंडळातर्फे गरजूंना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 

गरजूंच्या मदतीसाठी संस्था, मित्रमंडळ सरसावले

sakal_logo
By
धनंजय देशपांडे

पाथरी (जि.परभणी) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असल्याने हातावर पोट भरणाऱ्याची उपासमार होऊ नये, यासाठी नेते मंडळी व सामाजिक संस्था पुढे आल्या असून त्यांच्याकडून गरीब व गरजूंना अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे.

कोरोना विषाणूच्या आजाराने सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. तर त्यामुळे लॉकडाउन करण्यात आले असल्याने आशा परिस्थितीत दैनंदिन जीवनासाठी किमान राशनची आवश्यकता लक्षात घेत आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्याकडून शहरातील तीन हजार ४८० गरजू कुटुंबांना साधारण १५ दिवस पुरेल एवढे राशन वितरीत करण्याच्या योजनेला ता. सात एप्रिल रोजी सुरवात झाली होती. आतापर्यंत दोन हजार २५० कुटुंबांना रेशन किटचे वाटप करण्यात आले असून ता. १४ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील रेशन किट वाटप सुरू करण्यात आले आहे.

खासदार संजय जाधव
खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांच्या वतीने बुधवारी (ता.१५) पाथरी शहरातील हनुमाननगर, माळीवाडा, नामदेवनगर, महिपाल गल्ली, शिंदे गल्ली, येथील गरीब व गरजू कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे धान्य व किराणा सामान शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिनाथ शिंपले, बाळू देशमुख, रोहन धर्मे, शंकर नाईकवाडे, बाळू देशमुख, राधे गिराम, रामप्रसाद कुटे, कृष्णा कदम व प्रताप शिंदे यांनी घरपोच नेऊन दिले.

हेही वाचा - धक्कादायक : परभणी आढळला कोरोना बाधीत पहिला रुग्ण
 

परिवर्तन विकास मित्र मंडळ
परिवर्तन विकास मित्र मंडळाचे अध्यक्ष सईद ऊर्फ गब्बर खान यांच्या वतीने गुरुवारी (ता. १६) शहरातील गरजू कुटुंबांना राशन किटचे वाटप करण्यात आले. एकतानगर येथील त्यांच्या निवासस्थानी सकाळी दहा वाजता तहसीलदार यू. एन. कागणे, पोलिस निरीक्षक के. बी. बोधगिरे यांच्या हस्ते या राशन किट वाटपाची सुरवात केली. या वेळी गब्बर खान यांनी पाथरीसह सेलू, मानवत व सोनपेठ तालुक्यातील गरजूंना राशन किट घरपोच दिले जाणार असल्याचे सांगितले.

हेही वाचा व पहा -  व्हिडिओ : पोलिस हवालदार विठ्ठल कटारे यांची गाण्यातून जनजागृती

सोमेश्वर मित्र मंडळ
पाथरी शहरातील वैशनव गल्लीतील सोमेश्वर मित्र मंडळाच्या वतीने ८० गरजू कुटुंबांना एक महिना पुरेल एवढे राशन किटचे वाटप करण्यात आले. यासाठी सोमेश्वर मित्र मंडळाचे अरुण दैठणकर, सुधीर कोंत, राहुल भोकरे, महेश जोशी, तुकाराम कुलकर्णी, उमेश डावरे, गणेश चंदनवार, मोहन जोशी, धनंजय पाटील यांनी पुढाकार घेतला. शहरात लॉकडाउननंतर अडकलेल्या परराज्यातील दहा मजुरांना जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने अन्नधान्याची मदत जय संघर्ष ग्रुपचे तालुका अध्यक्ष नाना तुपे, बाळासाहेब शेंडगे, सतीश कोल्हे, वैभव टोके, शारेख खान यांनी केली.