कोरोनाने हिरावले मराठवाड्यातील दीड हजारावर बालकांच्या डोईवरचे छत्र

शून्य ते अठरा वयोगटातील अशा बालकांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे
orphan
orphanorphan

औरंगाबाद: कोरोनामुळे अनेक कुटुंबातील आईवडीलांचे छत्र हरपलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात बाल संगोपन योजनेंतर्गत टास्क फोर्स स्थापन करण्यात आले आहेत. या टास्क फोर्सच्यावतीने आतापर्यंत मराठवाड्यात कोरोनामुळे आई-वडीलांचे छत्र हरपलेल्या १ हजार ५०४ मुलांचा शोध घेण्यात आला आहे. यात २७ मुलांचे दोन्ही पालक कोरोनाने हिरावले असून १८१ मुलांची आई तर १,२९६ मुले वडिलांविना पोरकी झाली आहेत.
कोरोनाच्या विळख्यात अनेक कुटुंब सापडले आहेत, यात कर्ती माणसे जग सोडून गेली. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बालकामगार, बालभिक्षेकरी किंवा मानवी तस्करीत सापडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने देखील टास्क फोर्स गठीत करण्याचे निर्देश दिले होते.

यानुसार शून्य ते अठरा वयोगटातील अशा बालकांना आधार देण्यासाठी राज्य शासनाने टास्क फोर्सची स्थापना केली आहे. त्यानुसार मराठवाड्यात १८ मेरोजी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. गावपातळीवरील अशा बालकांचा शोध घेऊन निराधार झालेल्या बालकांचा शोध घेत माहिती संकलित करण्यात येत आहे. यात आतापर्यंत मराठवाड्यात १ हजार ५०४ मुलांचा शोध घेण्यात आला आहे.

orphan
नियम पाळून शहराला पहिल्या टप्प्यातच ठेवा - जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण

ज्या मुलांचे दोन्ही पालक कोरोनामुळे मृत्यू पावले आहेत व बालकांची काळजी घेण्यासाठी कोणीही नाही. तसेच ज्याचे दोन्ही पालक कोरोनामुळे दवाखान्यात भरती आहेत व बालकाला तात्पुरता आश्रय पाहिजे असेल बालकाला काळजी व संरक्षणाची कुठलीही गरज भासत असल्यास सेव द चिल्ड्रेन्स- ७४०००१५५१८/८३०८९९२२२२ अध्यक्ष, बाल कल्याण समिती, औरंगाबाद -९८२२७६२१५७, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, औरंगाबाद-९३७०००३५१७चाईल्ड लाईन – १०९८ या क्रमांक वर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण समिती तथा जिल्हा महिला बाल विकास कार्यालयाच्यावतीने करण्यात आलेले आहे.

मराठवाड्यात १ हजार ३५८ मुलांना तातडीने काळजी व संरक्षणाची गरज आहे. यात औरंगाबाद ३३८, जालना ६७, परभणी १२३, हिंगोली ४७, बीड १८९, नांदेड २७९, उस्मानाबाद १११ तर लातूर जिल्ह्यात २०८ मुलांचा समावेश आहे.

कोरोना काळात आईवडिलांचे छत्र हरवलेल्यांचा तपशील

जिल्हा----------- मुले------- आई------- वडील------ आई-वडील दोन्ही

औरंगाबाद --------३३९-------६१ ---------२६५ ---------१३
जालना -------------७१----------९ ---------६१ -----------१
परभणी------------- १४७-------१२ -------१३४ ---------१
हिंगोली-------------- ४७ -------७ ---------३९ -----------१
बीड----------------- ३०३ -------२६ --------२७४ --------३
नांदेड---------------- २७९ -------२० ----------२५४ ------४
उस्मानाबाद---------- ११४ --------२१ -----------९१ ------२
लातूर------------------ २०४ ---------२५ ---------१७८ ----१
-------------------------------------------------------------------------
एकूण -------------------१५०४ ---------१८१ --------१२९६ ----२७

orphan
Photo Story: भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्यानांची 'झलक'

दोन पालक गमावलेल्या बालकांसाठी नुकतेच शासनाच्यावतीने बालसंगोपन आणि पाच लाखांची मुदत ठेवीची योजना जाहीर करण्यात आली आहे. परंतु, अद्याप याबाबत कोणतेही लिखित आदेश मिळालेले नाहीत. प्रत्येक जिल्ह्यात सर्वेक्षणाचे काम सुरू असून यात आणखीन भर पडण्याची शक्यता आहे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना बालकल्याण समितीकडे सोपवण्यात येत असून बालसंगोपन व बालगृहात प्रवेश देण्यात येत आहे.
-हर्षा देशमुख, विभागीय उपायुक्त, महिला व बाल विकास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com