उस्मानाबाद कोरोना अपडेट : १८२ पॉझिटिव्ह, दहा बाधितांचा मृत्यू  

तानाजी जाधवर
Sunday, 20 September 2020

जिल्ह्यामध्ये आज १८२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दहा जणांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. जिल्ह्यामध्ये ११५ जण आज दिवसभरात बरे होऊन घरी देखील परतले ही बाब दिलासादायक. आतापर्यंत ७,१६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

उस्मानाबाद : जिल्ह्यामध्ये आज १८२ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दहा जणांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे. जिल्ह्यामध्ये ११५ जण आज दिवसभरात बरे होऊन घरी देखील परतले ही बाब दिलासादायक. आतापर्यंत ७,१६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा एरिया
 
जिल्ह्यामध्ये झालेल्या दहा मृत्युमध्ये सहा जण उस्मानाबाद तालुक्यातील आहेत. तर कळंब तालुक्यातील दोन व लोहारा तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी येथील ६० वर्षीय महिला, शहरातील ओम नगर भागातील ६८ वर्षीय पुरुष, दत्त नगर येथील ७० वर्षीय स्त्री, परशुराम कॉलनी येथील ६४ वर्षीय पुरुष, बार्शी नाका परिसरातील ६५ वर्षीय पुरुष तसेच ईला येथील ६५ वर्षीय पुरुष अशा सहा जणांचा जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या शिवाय कळंब तालुक्यातील गौर येथील ७० वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे. तालुक्यातीलच देवधानोरा येथील ६७ वर्षीय स्त्रीचा मृत्यु झाला आहे. लोहारा तालुक्यातील नागुर येथील ६० वर्षीय पुरुषाचा तुळजापुर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे. आष्टा कासार येथील ५७ वर्षीय पुरुषाचा लातुर येथील खाजगी रुग्णालयामध्ये मृत्यु झाला आहे.

तालुकानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी 

  • आज आलेल्या १८२ रुग्णापैकी ४० जण आरटीपीसीआरद्वारे तर १२८ जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर १४ जणांना इतर जिल्ह्यामध्ये कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यात ६० रुग्ण आढळले आहेत. त्यातील आठ जण आरटीपीसीआरद्वारे तर ४८ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तर चार जणांना परजिल्ह्यामध्ये बाधा झाली आहे.
  • तुळजापुर येथील १६ जण बाधित असुन त्यामध्ये नऊ जण आरटीपीसीआरद्वारे तर सात जणाची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
  •  
  • उमरगा तालुक्यातील २६ जणांना कोरोनाची लागन झाली असुन पाच जण आरटीपीसीआरद्वारे तर १९ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. 
  • कळंब तालुक्यातील ३६ जणांना कोरोनाची बाधा झाली असुन त्यामध्ये सहा जण आरटीपीसीआरद्वारे तर २९ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.
  • भुम तालुक्यात २४ जण बाधित असुन त्यामध्ये तीन जण आरटीपीसीआरद्वारे पॉझिटिव्ह आढळले असुन १६ जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. परजिल्ह्यामध्ये पाच जणांना कोरोनाची लागन झाली आहे. परंडा आठ, वाशी नऊ तर लोहारा तीन अशी तालुक्यानिहाय रुग्णांची संख्या आहे.

उस्मानाबाद कोरोना मीटर 

  • एकुण रुग्णसंख्या - १०२६५
  • बरे झालेले रुग्ण - ७१६६
  • उपचाराखालील रुग्ण- २८००

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osamanabad Corona Update news