खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या बनावट जातप्रमाणपत्राचं 'उमरगा कनेक्शन' !

jay siddheshwar swami
jay siddheshwar swami

उमरगा (उस्मानाबाद): भाजपाचे सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या बनावट जातप्रमाणपत्र चौकशीच्या अनुषंगाने गुरुवारी (ता. चार) सोलापूरच्या गुन्हे अन्वेषन पथकाने डिग्गी (ता.उमरगा) येथील ग्रामपंचायत सदस्य गुरूबसय्या स्वामी यांची चौकशी केली. दरम्यान पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तहसीलदार संजय पवार यांची भेट घेऊन जात वैधता प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या कागदपत्राची पाहणी केली.

खासदार डॉ. महास्वामीजी यांच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी आवश्यक त्या पुराव्याची जमवाजमव "उमरगा कनेक्शन" मधून झाल्याची माहिती समोर आली आहे. तालुक्यातील तलमोड येथील गुरूबसय्या स्वामी हा जूना काळातील व्यक्ती एका पाटलाचे शेत बटईने करत होता, त्या अनुषंगाने शेतजमिनीवर त्याचे नाव आले. अशी माहिती सांगितली जाते.

जात वैधता प्रमाणपत्र समितीकडे हा पुरावा सादर करण्यात आला होता. दरम्यान महास्वामीचे जात प्रमाणपत्र अक्कलकोट तहसीलमधून निघाले, त्याचा पुरावा उमरगा कनेक्शनमधून जोडण्यात आल्या. हा सर्व प्रकार कोणत्या आधारे घेतला, बनावटगीरी कशी झाली याचा सोक्षमोक्ष केला जातोय. या सर्व प्रकारामुळे खासदार डॉ.महास्वामीजी चांगलेच अडचणीत आले आहेत.

गुन्हे अन्वेषन शाखेची चौकशी
सोलापूरच्या गुन्हे अन्वेषन शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय साळूंके यांचे पथक चौकशीसाठी गुरूवारी उमरग्यात आले होते. डिग्गी ग्रामपंचायतीचे सदस्य, सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी गुरूबसय्या स्वामी यांची पथकाने चौकशी केल्याची माहिती सांगण्यात येते. यात नेमकी कोणती चौकशी झाली, श्री. स्वामी यांना पोलिसांनी सत्य समोर आणण्यासाठी सखोल चौकशी केल्याचे समजते. या बाबतची अधिकृत माहिती समोर आली नाही.

दरम्यान चौकशी झालेला व्यक्ती श्री. स्वामी यांच्या माहितीनुसार, सोलापूरच्या पोलिसांनी चौकशी केली. खासदार डॉ. महास्वामीजींना मी ओळखत नाही मात्र मागच्या वर्षी समाज बांधव म्हणून माझ्याकडे कांही व्यक्ती आले होते, त्यांच्याकडे तहसील कार्यालयातील नकला होत्या. नकलेचा संदर्भ तलमोडचा असल्याने शपथपत्रासाठी तेथील चार लोकांशी संपर्क केला. यात माझी एवढीच भूमिका होती. समितीने पुन्हा शुक्रवारी (ता.पाच) सोलापूरला चौकशीसाठी बोलावले असून जाणार आहे, असे श्री. स्वामी यांनी सांगितले.

"सोलापूरच्या एलसीबीचे अधिकारी आले होते, त्यांनी खासदार डॉ. महास्वामीजी यांच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी पुरावा म्हणून सादर केलेल्या मूळ कागदपत्राची मागणी केली. मात्र मूळ कागदपत्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल असल्याने त्यांना सत्य प्रति देण्यात आल्या. - संजय पवार, तहसीलदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com