Osmanabad : मुलीला जाळून मारणाऱ्या आई, बहिणीला जन्मठेपेची शिक्षा

आई सुलाबाई, भावजयी वैशाली व बहीण महादेवी यांनी घरामधील रॉकेल ममताच्या अंगावर ओतले. ममता पळत घराबाहेर गेली....
मुलीला जाळून मारले
मुलीला जाळून मारलेesakal

उस्मानाबाद : मुलीला जाळुन मारणाऱ्या आई, बहिण व भावजयीला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पैसे देण्याच्या कारणावरुन तिला जाळुन टाकल्याचे प्रकरण होते. ममता नाना पवार यांच्या जबाबावरुन तुळजापुर पोलीस ठाण्यामध्ये २६ मे २०१६ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. यामध्ये ममताची आई सुलाबाई हनुमंत काळे, भावजयी वैशाली ज्ञानेश्वर काळे (रा.ढेकरी, ता.तुळजापुर) (Tuljapur) व बहीण महादेवी नंदु शिंदे (रा.नरखेड, ता.मोहोळ, जि.सोलापुर) यांनी संगनमत करुन ममताला पैसे देण्याच्या कारणावरुन नेहमी भांडत होते. तू येथे कशाला राहते असे म्हणुन त्रास दिला जात होता. २४ मे २०१६ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या (Osmanabad) सुमारास तिची आई सुलाबाई, भावजयी वैशाली व बहीण महादेवी यांनी घरामधील रॉकेल ममताच्या अंगावर ओतले. ममता घराबाहेर पळत गेली. त्यावेळी तिच्या (Crime Against Woman) अंगावर पेटलेली काडी टाकण्यात आली. ममता जळालेल्या अवस्थेत वाचवा म्हणत मोठ-मोठ्या आवाजात ओरडत मंदिराकडे गेली. (Osmanabad Crime Mother, Sister Get Life Imprisonment For Killing Daughter)

मुलीला जाळून मारले
केंद्र व राज्य सरकार गंभीर नसल्याने OBC वर अन्याय : इम्तियाज जलील

त्यावेळी मंदिरात भजनासाठी आलेल्या लोकांनी वाकळ अंगावर टाकुन आग विझवले. ममताला तिच्या पतीने तुळजापुर येथील सरकारी दवाखान्यात नेले. त्यानंतर पुढील उपचारासाठी पुण्यातील ससुन रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात ममताने उपचारादरम्यान २७ मे २०१६ रोजी पुणे येथील रुग्णालयात मृत्युपुर्व जबाब नोंदविण्यात आला होता. तिच्या फिर्यादीवरुन या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात साक्षीदार, कार्यकारी दंडाधिकारी तसेच डॉक्टर यांचा पुरावा मृत्युपूर्व जबाबाला दुजोरा देणारा ठरला. या प्रकरणात महिला ही पारधी समाजाची असुन ती ९५ टक्के जळालेली होती. यावर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यानी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकुन घेतला.

मुलीला जाळून मारले
Aurangabad|भरस्त्यात पोलिसाचा दोरीने आवळला गळा, औरंगाबादेत खळबळ

तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे विचारात घेऊन महिलेचे मृत्युपुर्व जबाबाचा विचार करुन सरकार पक्षाच्या बाजुने निकाल दिला. सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन तिन्ही आरोपींना प्रत्येकी जन्मठेपेची शिक्षा व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पंडीत जाधव यानी काम पाहिले. कोर्ट पैरवी श्रीमती व्ही.आर.वाघमारे यानी काम केले. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक आर.ए.भंडारी यांनी केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com