कोरोनाची लस घेतल्यानंतरही उस्मानाबादचे जिल्हाधिकारी दिवेगावकर कोरोना पाॅझिटिव्ह

तानाजी जाधवर
Sunday, 21 February 2021

कोरोना संसर्ग अधिक वेगाने पसरल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जिल्ह्यात अनेक सामाजिक त्यातही गर्दीचे कार्यक्रम दरम्यानच्या काळात झालेले आहेत.

उस्मानाबाद :  जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाची लस घेतल्यानंतर त्यांना संसर्ग झाला असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सध्या जिल्ह्यातील यंत्रणेच्या प्रमुख व्यक्तीलाच लागण झाल्याने गांभीर्याने घेण्याची गरज व्यक्त होऊ लागली आहे.

वाचा - औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारची दुभाजक ओलांडून ट्रकला धडक; एक ठार, तर एक गंभीर जखमी

जिल्ह्यामध्ये दररोज रुग्णसंख्या वाढत आहे, फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून त्यात अधिक वाढ झाली आहे. अगोदर साधारण सहा ते दहा असणाऱ्या रुग्णांची संख्या थेट वीस ते २५ च्या घरात जाऊ लागली आहे. त्यातही अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना याची लागण झाल्याने ही बाब ठळकपणे समोर आली आहे. त्यामध्ये स्वतः जिल्हाधिकारी दिवेगावकर हे देखील आहेत. अनेक राजकीय पुढाऱ्यांनाही त्याची लागण झाली असून मधल्या काळात नियमाबाबत गांभीर्य दाखविले नसल्याचे परिणाम म्हणुन संसर्गाची साथ सूरु झाल्याचे दिसत आहे.

वाचा - औरंगाबाद-जालना रस्त्यावर थरार! धावत्या ट्रॅव्हल्सला लागली अचानक आग, चालक आणि क्लिनरने बसमधून मारल्या उड्या

हा संसर्ग अधिक वेगाने पसरल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जिल्ह्यात अनेक सामाजिक त्यातही गर्दीचे कार्यक्रम दरम्यानच्या काळात झालेले आहेत. काही होणार होते, त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पण जिथे कार्यक्रम झाले आहेत, तिथे मात्र कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही दिवसात त्याचे अधिक व्यापक स्वरुप समोर येण्याची भिती व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी जिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार घेऊन घरामध्येच विलगीकरणात आहेत. तिथुनच ते काम करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी पुढील काळात संसर्गाचे व्यापक स्वरुप पाहुन कोविड सेंटर चालु करण्याबाबतचे नियोजन देखील केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad District Collector Divegaonkar After Vaccinationa Again Corona Positive