esakal | उस्मानाबाद जिल्हा बँकेस शासकीय थकहमीच्या प्रस्तावास पहिल्या टप्प्यात वीस कोटी रुपये मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad District Cooperative Bank News

तेरणा सहकारी साखर कारखाना व तुळजाभवानी साखर, नरसिंह सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जापोटी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 24 ऑगस्ट 2020 रोजी 152 कोटीं रुपयाचा प्रस्ताव साखर आयुक्त यांना पाठविण्यात आला होता.

उस्मानाबाद जिल्हा बँकेस शासकीय थकहमीच्या प्रस्तावास पहिल्या टप्प्यात वीस कोटी रुपये मिळणार

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : तेरणा, तुळजाभवानी व नृसिंह सहकारी कारखानाच्या कर्जापोटी जिल्हा बँकेस शासकीय थकहमीच्या प्रस्तावास पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपये देण्याचे अर्थमंत्री अजित पवार यानी मान्य केले आहे. तेरणा सहकारी साखर कारखाना व तुळजाभवानी साखर, नरसिंह सहकारी साखर कारखान्यांच्या कर्जापोटी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा 24 ऑगस्ट 2020 रोजी 152 कोटीं रुपयाचा प्रस्ताव साखर आयुक्त यांना पाठविण्यात आला होता. शासकीय थकहमीचा प्रस्ताव आल्यानंतर 25 फेब्रुवारी 2021 रोजी श्री.गायकवाड यांची खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास घाडगे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या समवेत भेट घेतली होती.

वाचा - वाळूज एमआयडीसीतील प्लास्टिक कंपनीला भीषण आग, करोडो रुपयांचे नुकसान

या भेटीमध्ये तो प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्याची विनंती करण्यात आली होती. तो प्रस्ताव सहकार कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तो अर्थ विभागाकडे पाठवून त्यावर सकारात्मक विचार व्हावा. याबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना फोन करून सूचना केल्या होत्या.

तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन तशी विनंती या शिष्टमंडळाने केली होती. त्या पार्श्वभुमीवर मंगळवारी (ता.दोन) उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेतली हा प्रस्ताव मंजुर करण्याची विनंती केली. श्री. पवार यांनी या थकहमीपोटी पहिल्या टप्प्यात 20 कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. याबाबत माहिती खासदार राजेनिंबाळकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image