उस्मानाबादची कामगिरी : शेतकरी उत्पादक कंपन्यांचा पुढाकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Osmanabad Farmer Producer Companies Soybean seed

उस्मानाबादची कामगिरी : शेतकरी उत्पादक कंपन्यांचा पुढाकार

उस्मानाबाद - बियाणे उत्पादनामध्ये जिल्ह्याने एक क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनीचे बियाणे हिमाचल प्रदेशासह दक्षिणेतील कर्नाटक, तेलंगणामध्येही पोचले आहे. दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यासाठी ही एक अभिमानास्पद बाब असून यापुढेही जिल्ह्यातील बियाणे विविध राज्यांत पोचेल असा विश्‍वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

अवर्षणग्रस्त जिल्हा म्हणून उस्मानाबादची ओळख आहे. तर देशातील अविकसित जिल्ह्यांमध्ये उस्मानाबादचा समावेश आहे. मात्र सध्या बियाणे उत्पादनात जिल्हा एक-एक उच्चांक गाठत आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र तब्बल अडीच हजार हेक्टरच्याही पुढे गेले आहे. तर बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची संख्याही वाढत असून मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. यंदा जिल्ह्यातील बियाण्याला हिमाचल प्रदेशातून मागणी आली होती. त्यानुसार जिल्ह्यातील बियाणे तेथे पोचले आहे.

शेतकऱ्यांचा सहभाग

जिल्ह्यात यंदा ३४ शेतकरी उत्पादक कंपन्या बियाणे उत्पादनात सहभागी झाल्या आहेत. देशातील सोयाबीनची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून बियाणेही त्या प्रमाणात उत्पादित केले जात आहे. जिल्ह्यातील ओडीएसएफ या कंपनीने यंदा उत्पादित झालेले बियाणे हिमाचल प्रदेशात पाठविले आहे. केडीएस ७२६, केडीएस ७५३ या वाणाला हिमाचल प्रदेशातून मागणी होती. त्यामुळे या कंपनीचे बियाणे हिमाचल प्रदेशासह विविध राज्यांत पाठविण्यात आले आहे.

बियाण्याची मोठी मागणी आहे. दर्जेदार बियाणे उत्पादन करून वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना आहे. यापुढेही मागणी वाढणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खात्रीशीर, दर्जेदार बियाणे उत्पादन करावे.

- मोहन गोजमगुंडे, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी, उस्मानाबाद

यंदा बियाण्याची मागणी मोठी होती. त्यानुसार तेलंगणा, कर्नाटक यासह हिमाचल प्रदेशातही बियाणे पाठविले आहे. आम्ही दर्जेदार बियाणे उद्पादित करीत आहोत. त्यामुळे मागणी वाढत आहे. यापुढेही शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे देऊ.

- ॲड. अमोल रणदिवे, व्यवस्थापकीय संचालक, ओडीएसएफ, उस्मानाबाद

Web Title: Osmanabad Farmer Producer Companies Soybean Seed Export

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..