उस्मानाबाद : युनिव्हर्सिटी प्रोग्राममधील समावेशामुळे योगपटूंना भवितव्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

योग

उस्मानाबाद : युनिव्हर्सिटी प्रोग्राममधील समावेशामुळे योगपटूंना भवितव्य

उस्मानाबाद : बऱ्याच काळापासून स्पर्धात्मक खेळ असणाऱ्या योगासन प्रकारास केंद्र शासनाने अधिकृत मान्यता देण्याच्या निर्णयामुळे फिट इंडिया चळवळीला चालना मिळत असून खेलो इंडिया स्कूल आणि युनिव्हर्सिटी प्रोग्राममध्ये समावेश झाल्यामुळे योगपटूंना चांगले भवितव्य असल्याचे मत जिल्हा योगासन स्पोर्ट्स संघटनेचे अध्यक्ष नितीन तावडे यांनी व्यक्त केले.

उस्मानाबाद येथील तुळजाभवानी क्रीडा संकुलात रविवारी महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व बृहन महाराष्ट्र योग परिषदेच्या अधिपत्याखाली उस्मानाबाद जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि दि. उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट योग असोसिएशनच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेच्या उद्‍घाटन प्रसंगी उस्मानाबाद जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन तावडे बोलत होते. यावेळी दि उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट योग असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत कुदाळ, क्रीडाधिकारी कैलास लटके, जिल्हा कोऑर्डिनटर प्रवीण गडदे, सचिव योगेश उपळकर, सुरेंद्र वाले, कोषाध्यक्ष अभय वाघोलीकर, योगशिक्षक दीपक भांगे, कैलास लांडगे आदींची उपस्थिती होती.

स्पर्धेत प्रमिला वीर, विनिता जाधव, प्रणाली जगदाळे, तेजस अलसेट यांनी पंच म्हणून काम पहिले. स्पर्धा १४,१८ वर्षाखाली व १८ वर्षांपुढील मुले मुलींच्या वयोगटात ट्रॅडिशनल, आर्टिस्टिक व रिदमिक योगासन प्रकारात घेण्यात आल्या. या स्पर्धेतून राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी जिल्ह्याचा संघ संघटनेच्यावतीने जाहीर करण्यात आला आहे. ट्रॅडिशनल योगासने प्रकारात नऊ ते १४ वर्षे मुलात मकरंद दिक्षित, शुभम दिक्षित, चैतन्य डोलारे, मुलींमध्ये हिंदवी चौरे, अंजली साळुंके आणि नंदिनी जांगीड, १४ ते १८ वर्षे मुलात गणेश खंडागळे, श्रुतिक उपळकर तसेच १८ वर्षे पुढील मुलात रुद्राक्ष बिराजदार यांचा समावेश आहे. आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारात नऊ ते १४ वर्षे मुलीत हिंदवी चौरे, १४ ते १८ वर्षे मुलात इंद्रपाल चिथडे, सिद्देश कात्रे आणि १८ वर्ष पुढील मुलात ओंकार मोरे, चेतन काटे हे तर रिदमिक योगासन पेअर प्रकारात नऊ ते १४ वर्षे मुलींमध्ये अंजली साळुंके व नंदिनी जांगीड यांचा समावेश आहे.

Web Title: Osmanabad Inclusion In University Programs Bodes

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sakal