
या बंदमध्ये देशातील नऊ कोटी व्यापारी व साडेतीन कोटी व्यावसयिक सहभागी झालेली आहे
उमरगा(उस्मानाबाद): #BharatBandh: जीएसटी करप्रणाली कायद्याच्या जाचक अटींच्या विरोधात व्यापाऱ्यांनी शुक्रवारी (ता.२६) पुकारलेल्या एक दिवसीय देशव्यापी बंदला उमरगा शहर व ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला. दरम्यान उमरगा शहरातील सर्व बाजारपेठेतील दुकाने पूर्णतः बंद ठेवण्यात आले होते.
उमरगा व्यापारी महासंघाने याबाबत उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जीएसटी कायद्याची (वस्तू व सेवा कर) व्यापाऱ्यांना होणारी अडचण, तसेच जीएसटी कायद्यात ९२७ वेळा बदल करण्यात आले आहेत.
Success Story: महिलेने स्वकर्तृत्वाने फुलवलेल्या द्राक्ष बागेचे यशस्वी तिसरे...
नवीन कायद्यात व्यापाऱ्यांना कर सल्लागार व सी.ए. यांना अटक करण्याचे प्रावधान ठेवले आहे, या व अन्य अनेक अटी नवीन कायद्यामध्ये जाचक ठरणाऱ्या आहेत, त्याला विरोध करण्यासाठी कॉनफिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या वतीने देशव्यापी बंद पुकारण्यात आला. या बंदमध्ये देशातील नऊ कोटी व्यापारी व साडेतीन कोटी व्यावसयिक सहभागी झालेली आहे. यात उमरगा व्यापारी महासंघ सहभागी झालेला आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने शहरात कडक निर्बंध; जाणून घ्या नियमावली
यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, कार्याध्यक्ष नितीन होळे, सचिव शिवप्रसाद लड्डा, संतराम मूरजानी, महेश आळंगे, रणजीत कटके आदी व्यापारी उपस्थित होते. दरम्यान शहरातील शिवाजी चौकातील मुख्य बाजारपेठ, सराफ लाईन, पतंगे रोड, इंदिरा चौक, राष्ट्रीय महामार्ग, आरोग्यनगर आदी भागातील सर्व व्यापार बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट दिसत होता