esakal | होत्याचं नव्हतं झालं! हरभरा विकून घरी जात असलेल्या शेतकऱ्याला चोरांनी धुम स्टाईलने लुटले
sakal

बोलून बातमी शोधा

robery

ही घटना गुरुवार (ता.१८) रात्री १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील मलकापूर-सापनाई रस्त्यावर घडली

होत्याचं नव्हतं झालं! हरभरा विकून घरी जात असलेल्या शेतकऱ्याला चोरांनी धुम स्टाईलने लुटले

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद): मालवाहतूक करणाऱ्या पिकपला दुचाकी आडवी लावून अज्ञात चोरट्यांनी शेतकऱ्याला दोन लाख ८० हजार रुपयाला लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गुरुवार (ता.१८) रात्री १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील मलकापूर-सापनाई रस्त्यावर घडली. याप्रकरणी येरमळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसानी सांगितले की, बुधवार (ता.१७) रोजी सापनाई येथील  विजय भोरे यांनी स्वतःच्या शेतातील हरभऱ्याचे ६० पोती महिंद्रा पिकअप (MH-२५ P-५५१४) मधून लातूर येथील किसान एरावर्स या कंपनीकडे विक्रीसाठी नेले होते. या कंपनीत हरभरा विक्री विकून रात्री परत येत असताना मलकापूर - सापनाई रस्त्यावर हॉटेल स्नेहासमोर नंबर नसलेली पॅशन प्रो ही दुचाकी घेऊन अंदाजे २५ ते ३० वयोगटातील तिघेजण तोंडाला मास्क लावून थांबलेली दिसले.

वाशी पोलिसांची मोठी कारवाई, गांजासह ६५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जेवणानंतर निघाल्यानंतर पिकअपचा पाठलाग करत पाठीमागून मोटारसायकलवर तिघेजण आले व त्यांनी पिकअपसमोर दुचाकी आडवी लावली. ड्रायव्हरने गाडी बाजूला घेतली असता, दुचाकीवरील एक जण गाडीकडे धावत येऊन ड्रायव्हरला, तू आमच्या अंगावर का थुकलास म्हणून भांडू लागला. भांडण सुरु असताना मोटारसायकलवरील काळा जॅकेट घातलेल्या दुसऱ्या तरुणाने पिकअपमधली पैसे ठेवलेली पेटी उचकून त्यातील रोख रक्कम  दोन लाख ६० हजार रुपये व पेटीतील चिल्लर रक्कम दहा हजार रुपये व एक मोबाईल फोन असे एकूण दोन लाख ८० हजार हजार रुपये घेऊन तिघेही दुचाकीवरून पळून गेले.

संचारबंदी अपडेट्स: शुक्रवारपासून रात्री आठला बंद होणार बाजारपेठा

ही घटना इतकी जलद घडली की शेतकऱ्याला काहीच कळेनासे झाले. ही घटना पाहून स्त्यालगत असणार्‍या शेतातील शेतकरी भारत पायाळ हे जवळ आले व  त्यांच्या मोबाईल फोनवरून येरमाळा पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले व शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतू त्या ठिकाणाहून  पसार झाले होते. विजय मोरे यांच्या फिर्यादीवरून येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा ठाण्यात गुन्हा येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा  दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंडे हे करत आहेत.