esakal | आगारात उभी असलेल्या एसटीने घेतला अचानक पेट; बस जळून खाक
sakal

बोलून बातमी शोधा

st burnt in Bhum depo.

येथील एस. टी. आगारात उभी असलेली एक बसने अचानक पेट घेतला

आगारात उभी असलेल्या एसटीने घेतला अचानक पेट; बस जळून खाक

sakal_logo
By
अब्बास सय्यद

भूम (उस्मानाबाद): येथील एस. टी. आगारात उभी असलेली एक बसने अचानक पेट घेतला . या आगीत ती बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. ही घटना मंगळवार तारीख ६ रोजी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीने आगारात एकच खळबळ उडाली होती. भूम नगरपालिकेचे अग्निशमन दल यंत्रणा तात्काळ घटनास्थळी आल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

अग्निशमन दलाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले. याबाबत अधिक माहिती अशी की, भूम आगारात मूंबई- भूम ही फेरी करून आलेली बस (क्र एम एच २० बी एल ३८४७) ही डिझेल भरून पंपालगतच उभी केली होती. त्या गाडीतून धूर निघत असल्याचे काही चालक, वाहक व आगारातील कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी आग विझविण्याचे आटोकाट प्रयत्न केले मात्र डेपोत कर्मचाऱ्यांना पिण्यास पाणी मिळत नाही तर गाडी विझवायला कोठून येणार.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला शिवसेनेच्या मंत्र्याकडूनच केराची टोपली; मास्क न...

अखेर काही कर्मचाऱ्यांनी भूम नगरपालिकेची अग्निशमन दलाची गाडी बोलावली. तो पर्यंत आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग विझविण्याचे सूत्री हाती घेत काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले . तोवर एसटी पूर्णपणे आगीने जळून खाक झाली होती. मात्र त्या गाडीच्या आसपास असणाऱ्या गाड्या तेथील चालकांनी प्रसंगावधान राखून त्या गाडीपासून दूर नेऊन लावल्या.

किरीट सोमय्या म्हणतात, आघाडी सरकारचे अर्धा डझन मंत्री घरी जाणार

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे पेटलेल्या गाडीपासून १५ ते २० फूट अंतरावर एसटीचा पंप आहे. अग्निशमन दलाच्या गाडीस येण्यास वेळ लागला असता तर मात्र येथे मोठा अनर्थ घडला असता. यावेळी आग विझवत असताना एसटी कर्मचारी एम. आर. उपाध्ये हे किरकोळ जखमी झाले. मात्र दुर्दैव असे की त्याची चौकशी करण्यासाठी येथे आगार प्रमुख हजर नव्हते.

Aurangabad DCC Bank: जिल्हा बँकेचे स्टेरिंग सत्तारांच्या हातात; मात्र सेनेत फूट

भूम आगारात मोठया प्रमाणात अनागोंदी कारभार चालला असल्याची चर्चा कायम कर्मचाऱ्यांच्यात असते. आगार प्रमुख हे सतत गैरहजर असतात. त्यांना विचारायला कोणी नाही. त्यांनी येथे ज्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपवलेली असते. ते कर्मचारी आगार प्रमुखांना खोटी- नाटी माहिती पुरवून कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देतात. त्यामुळे येथील कर्मचारीही हैराण  झाले आहेत.

loading image