esakal | उमरग्यात व्यापाऱ्यांचा लॉकडाउनला विरोध; व्यापाऱ्यांनी घातला पोलिसांना घेराव
sakal

बोलून बातमी शोधा

umarga traders against lockdown.

पोलिस व पालिका प्रशासनाने आवाहन करत दुकाने केली बंद

उमरग्यात व्यापाऱ्यांचा लॉकडाउनला विरोध; व्यापाऱ्यांनी घातला पोलिसांना घेराव

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद): उमरगा शहरातील व्यापाऱ्यांनी लॉकडाउनला विरोध दर्शवत मंगळवारी (ता. सहा) सकाळी साडेअकरापर्यंत दुकाने सुरू ठेवली होती. पोलिसांनी दुकाने बंद करण्यासाठी बाजारपेठेत गस्त घातल्यानंतर दुकाने बंद झाली.  व्यापारी आर्थिक अडचणीत असताना दुकाने बंद करण्याचा निर्णय चूकीचा आहे.  कोरोनाचे नियम पाळत दुकाने सुरू ठेवण्याची मागणी करत व्यापाऱ्यांनी आमदार ज्ञानराज चौगुले, उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांना निवेदन दिले.

राज्य शासनाने विकेंड लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगांवकर यांनी सोमवारी (ता.पाच) रात्री आदेश काढून कोणत्या आस्थापना सुरू, कोणत्या बंद याबाबतचा आदेश काढला. मात्र याबाबत व्यापारी संभ्रमात होते त्यांनी मंगळवारी सकाळी दुकाने उघडली. एकीकडे पोलीस व पालिकेची यंत्रणा दुकाने बंद करण्याचे आवाहन करीत होते तर दुसरीकडे व्यापारी महासंघाची बैठक सुरू होती.

किरीट सोमय्या म्हणतात, आघाडी सरकारचे अर्धा डझन मंत्री घरी जाणार

बैठकीनंतर व्यापाऱ्यांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांची भेट घेऊन कैफियत मांडली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांना निवेदन देण्यात आले. शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद करण्याचा घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करावा. एक तर सर्व आस्थापना आठ ते दहा दिवस बंद करावेत, नसेल तर सर्व आस्थापना सुरू ठेवावेत. अशी मागणी व्यापाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला शिवसेनेच्या मंत्र्याकडूनच केराची टोपली; मास्क न...

या वेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रणधीर पवार, उपाध्यक्ष प्रदिप चालुक्य, सचिव शिवप्रसाद लड्डा, कार्याध्यक्ष नितीन होळे यांच्यासह कापड, सराफ, हार्डवेअर पेंट, भांडी, अॅटोमोबाईल्स, इलेक्ट्रॉनिक्स व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान एकीकडे व्यापारी दुकाने उघडी ठेवून लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे बाजू मांडत होती तर दुसरीकडे सहाय्यक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, उपनिरीक्षक अमोल मालुसुरे यांच्यासह कर्मचारी व पालिका यंत्रणेचे कर्मचाऱ्यांनी दुकाने बंद केली. त्यामूळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. अत्यावश्यक सेवेतील दुकाने मात्र सुरू होती.

loading image