Dharashiv Lok Sabha Election : धाराशिवमध्ये लोकसभेचा महायुतीचा उमेदवार ठरेना! मतदारांत उलट सुलट चर्चेला उधाण

Lok Sabha Election 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ मेला धाराशिव लोकसभेसाठी मतदान होणार आहे.
Osmanabad lok sabha constituency Dharashiv election politics MVA Vs NDA Marathi News
Osmanabad lok sabha constituency Dharashiv election politics MVA Vs NDA Marathi News

येरमाळा : आगामी लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्प्यात म्हणजे ७ मेला धाराशिव लोकसभेसाठी मतदान होणार आहे. उमेदवारी प्रक्रिया सुरु होण्यासाठी पंधरा दिवस वेळ राहिला असुन धाराशिव लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार निश्चित झाला नसल्याने मतदारांत विविध राजकीय चर्चेचे फड रंगले आहेत.

विरोधी महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित झाला असून ते प्रचाराला लागले आहेत. उमेदवारीतून पारंपरिक दोन्ही विरोधकांत सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपप्रत्यारोपाचे रान पेटले असेल तरी निवडणुकीचा खरी रंगात मतदारांना कधी पाहायला मिळेल,उमेदवारी निश्चित होत नसल्याने एरवी प्रमुख पक्ष म्हणून मिरवणाऱ्या जिल्ह्यातील पक्षाचे भवितव्य काय असेल अशा चर्चांना उधाण आले आहे.

धाराशिव लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालकिल्ला मानला जातो.गेल्या सहा लोकसभा निवडणुकीत २००९ ची निवडणूक वगळता या लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीतून शिवसेनेचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे दीड लाख मताने निवडून आले होते.मात्र गेल्या वर्ष भरापूर्वी राज्यात युतीचे सरकार गेल्या कांहीं महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीला सोबत घेऊन महायुतीचे राज्य झाले असताना लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार निश्चित होत नसल्याने मतदारांत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.

जिल्ह्याच्या राजकीय पटलावर महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तुलनेत पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी शरद पवार गट प्रबळ आहे.तर महाविकास आघाडीच्या उबाठा शिवसेनेच्या तुलनेत एकनाथ शिंदे गटाकडे दोन आमदार,पदाधिकारी कार्यकर्ते,एक महायुतीचे आमदार भाजपाचे तुळजापुरचे आमदार राणाजगजिसिंह पाटील आहेत.यांच्या पत्नी अर्चनाताई पाटील यांना अजित पवार राष्ट्रवादी कडून तर गेल्या दोन दिवसांपासून मुलगा मल्हार पाटील यांचे उमेदवारी साठी चर्चेत आल्याने मतदारांमध्ये विविध चर्चेला उधाण आले आहे.

Osmanabad lok sabha constituency Dharashiv election politics MVA Vs NDA Marathi News
Lok Sabha Election 2024 : साहेब... आमचं नशिब कधी ऊजळल...? निवडणुकांच्या तोंडावर मतदारांचा सवाल; पुढाऱ्यांचा खुर्चीसाठी खटाटोप

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये आमदार राणा पाटील,मुंबई ते सुरत मार्गे गुवाहाटीच्या राजकीय बंडाचे किंग मेकर शिंदे गटाचे प्रमुख नेते आमदार मा.ना.मंत्री तानाजी सावंत यांच्यात सख्ख्य असल्याचे जिल्ह्यांनी पाहिले आहे,मग जिल्हा परिषद निवडणुका असो की जिल्हा बँकेच्या निवडणुका असो.

धाराशिव लोकसभा मतदार संघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.सहा पैकी पाच वेळा शिवसेनेचे मतदार संघावर वर्चस्व असताना गेल्या निवडणुकीत धनुष्यबाण या चिन्हावर शिवसेनेचा उमेदवार विजय झाला होता वी जीयामुळे शिंदे गटाने ही जागा सोडली कशी,जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्ष म्हणून शिवसेना शिंदे गट,राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले राणा पाटील हे यांचे जिल्ह्यात राजकीय प्राबल्य असताना लोकसभेला उमेदवार मिळत नसेल तर जिल्ह्याच्या आगामी येणाऱ्या राजकारणात स्थानिक निवडणुकात जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत काय अस्तित्व राहिलं ते मतदारांना सामोरे जाणार कसे अशा चर्चांना उधाण आले आहे.

तर कांहीं राजकीय तज्ञांच्या मते भाजपाने केलेल्या सर्वेत धाराशिव ची जागा महाविकास आघाडीकडे जाणार असल्याची खात्री झाल्याने उमेदवारीसाठी बळीचा बकरा शोधला जात असल्याचे सांगितले जात आहे.

Osmanabad lok sabha constituency Dharashiv election politics MVA Vs NDA Marathi News
Fact Check: 'भारतरत्न' पुरस्कार सोहळ्यातील मल्लिकार्जून खर्गे यांच्याबाबतचा दावा खोटा, फेक फोटो व्हायरल

आरोप प्रत्यारोप.......

पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी राणाजगजिसिंह पाटील आणि ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यातील सोशल मीडियातून आरोप प्रत्यारोप केले जात असून राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नीने स्टेटस ठेऊन ओमराजे निंबाळकर हे शेतकरी आत्महत्या प्रकरणातील गुन्हेगार नराधम म्हणत टीका केली तर ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी महायुतीचा उमेदवार निश्चित होत नसल्याने सकाळी एक नाव संध्याकाळी एक अशी अवस्था झाली असुन बाप एका पक्षात आई एका पक्षात आता पोराला एका उरलेल्या पक्षात जा म्हणावं म्हणजे महायुती पूर्ण होईल अशी खिल्ली उडवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com