उस्मानाबाद : महत्त्वाच्या 'दस्तऐवजांचे' लवकरच संगणकीकरण

उस्मानाबाद पालिकेत स्कॅनिंगचे काम अंतिम टप्प्यात
Osmanabad Municipality
Osmanabad Municipalitysakal

उस्मानाबाद : पालिकेचे महत्त्वाचे आणि गोपनीय दस्तऐवज आता कॉम्प्युटरच्या फाइलमध्ये सुरक्षित होणार आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे महत्त्वाचे दस्तऐवज खराब होण्याचा धोका टळला आहे. शिवाय एका क्लिकवर सर्वच नागरिकांना त्यांचे दस्त घरातही उपलब्ध होणार आहेत.पालिकेच्या दप्तरामध्ये विविध प्रकारचे दस्तऐवज ठेवलेले असतात.

यामध्ये नागरिकांच्या घरांचे नकाशे, बांधकाम परवाने, यासह विविध भागाच्या विकासाचे नकाशे अशा बाबी जतन करून ठेवाव्या लागतात. काही नागरिक त्यांच्या स्वतःच्या दस्ताच्या नकलेची ऐनवेळी मागणी करतात. शिवाय जन्म-मृत्यू नोंदही पालिकेत ठेवली जाते. त्याचेही दस्तऐवज महत्त्वाचे असतात. मात्र जुने दस्तऐवज जीर्ण झाल्याने ते नाहीसे होण्याचा धोका तयार झाला होता. त्यासाठी पालिकेने त्यांचे सर्वच रेकॉर्ड स्कॅनिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन-चार महिन्यांपासून स्कॅनिंगचे काम सुरू आहे.

एका ‘क्लिक’वर मिळणार कागदपत्रे

विभागनिहाय कागदपत्रांचे स्कॅनिंग केले जात आहे. आतापर्यंत सात ते आठ विभागांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित तीन विभागांचे काम थोड्याच दिवसांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे पालिकेतील सर्वच दस्तऐवज जतन करण्याचे काम पूर्ण होत आहे. शहरातील अनेक नागरिक विविध प्रकारचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून पालिकेमध्ये येतात. एका फेरीत त्यांचे काम कधीच पूर्ण होत नाही. त्यांना पुन्हा-पुन्हा या कामासाठी पालिकेत चकरा माराव्या लागतात. मात्र, स्कॅनिंगचे काम पूर्ण झाल्यानंतर यातील अनेक कागदपत्रे नागरिकांना एका क्लिकवर पालिकेच्या साइटवर उपलब्ध होणार आहेत.

त्यामुळे थेट घरात बसूनही शहरातील नागरिकांना त्यांच्या मालमत्तेशी निगडीत कागदपत्रं मिळवता येणार आहेत. सध्या स्कॅनिंगचे काम सुरू आहे. पुणे येथील एका संस्थेला हे काम दिले असून लवकरच ते पूर्ण होईल. त्यानंतर नागरिकांना थेट पालिकेच्या वेबसाइटवरून विविध कागदपत्रं मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

-हरिकल्याण येलगट्टे, मुख्याधिकारी, उस्मानाबाद नगरपालिका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com