चिमुकल्यांनीही उचलला खारीचा वाटा

मुरूम (ता. उमरगा) : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करताना प्रा. आण्णाराव कांबळे व त्यांचे कुटुंबीय.
मुरूम (ता. उमरगा) : महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करताना प्रा. आण्णाराव कांबळे व त्यांचे कुटुंबीय.

मुरूम (जि. उस्मानाबाद) : उन्हाळी सुटीमध्ये मुंबईला जाण्यासाठी येथील एका कुटुंबातील चार मुला-मुलींनी गेल्या वर्षभरात जमा केलेले पैसे कोरोनाच्या संकटामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीला दिला. कुटुंबीयांनी त्यात पाच हजार रुपये देऊन एकूण आठ हजार ७२४ रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये शनिवारी (ता. ११) महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जमा केले. 

भीमनगरातील आण्णाराव कांबळे यांच्या घरीच शनिवारी (ता. ११) क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. कुटुंबातील अदिती, अस्मिता, हर्षल व विशाल या चौघांनी मिळून जसे जमतील तसे थोडेथोडे पैसे जमा केले होते. उन्हाळी सुटीमध्ये मुंबई दर्शनासाठी त्यांनी पिग्गी बँकेमध्ये तीन हजार ७२५ रुपये जमा केले होते.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  

शनिवारी महात्मा फुले यांच्या जयंतीदिनी हा गल्ला फोडून सध्या निर्माण झालेल्या कोरोना संकटामध्ये आपलाही खारीचा वाटा असला पाहिजे, या उद्देशाने ही रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्याचा निर्णय या मुलांनी घेतला. या निर्णयामुळे कांबळे कुटुंबीयांनीही यामध्ये पाच हजार रुपयांची रक्कम घालून एकूण आठ हजार ७२५ रुपये ऑनलाइनने याच दिवशी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केले.

महात्मा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी १७ व्या शतकात पुण्यामध्ये अशीच प्लेगची साथ सुरू झाली होती, त्यावेळी मुलांना उपचारासाठी सावित्रीबाई फुले दवाखान्यात घेऊन गेल्या. यादरम्यानच त्यांनाही प्लेगची लागण झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या चार चिमुकल्यांनी फुले दांपत्याच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकून त्यांचे विचार आत्मसात करीत मदत करण्याचा निर्धार केला; तसेच महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस वैशाली व रेश्मा कांबळे यांनी पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले.

प्रा. आण्णाराव कांबळे व प्रा. नानाराव कांबळे हे दोघेही दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वर्गणी देतात. यंदा कोरोनामुळे जयंती साध्या पद्धतीने व घरीच करावयाची असल्याने त्या वर्गणीतील द्यावयाची रक्कम त्यांनी आपल्या मुलांनी घेतलेल्या निर्णयाला साथ देत पाच हजार रुपयांची मदत केली. चिमुरड्यांनी जो एक संकल्प केला, यामुळे कांबळे परिवाराने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. खऱ्या अर्थाने आपण महापुरुषांचा वसा आणि वारसा चालवीत असल्याने या भूमिकेचे व चिमुकल्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com