धक्कादायक...उमरग्यात पाच कोरोना पॉझिटिव्ह

अविनाश काळे
बुधवार, 1 जुलै 2020

उमरगा उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यासह एक बँक कर्मचाऱ्याचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. एक आठवड्यात आठ रुग्ण आढळले आहेत. 

उमरगा (जि. उस्मानाबाद) : येथील उपजिल्हा रुग्णालयातून पाठविण्यात आलेल्या २३ स्वॅबपैकी पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यासह बँक कर्मचाऱ्याचा समावेश आहे. रूग्णालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने रुग्णालय प्रशासन हादरले आहे. दरम्यान लातूर येथे मृत्यू झालेल्या एका रूग्णाचा संपर्कातील तसेच अन्य भागातील असे चार जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

उमरगा शहरातील स्थानिक लोकांमध्ये गेल्या तीन महिन्यात कोरोनाचा शिरकाव नव्हता. मात्र गेल्या आठ दिवसांत पॉझिटिव्ह रूग्ण संख्या वाढत आहे. २७ जूनला एका स्थानिक नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर २९ जूनला त्या व्यक्तीच्या पत्नीचा व मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान या व्यक्तीच्या संपर्कातील तसेच औंढा (ता. निलंगा) येथील एक व्यक्तीचा शहरातील खासगी रुग्णालयातून लातूरला उपचारासाठी नेताना मृत्यू झाला होता. तर बलसूरचा रहिवाशी, मात्र शहरात घर असलेल्या एका व्यक्तीचा लातूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या मदतीसाठी माणुसकी धावली

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : अखेर ‘त्या’ सोयाबीन उत्पादक कंपनीवर नांदेडात गुन्हा दाखल 

या तिनही पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे २३ स्वॅब सोमवारी (ता.२९) पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाच पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. मंगळवारी रात्री उमरग्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या सहा असल्याची चर्चा आहे. मात्र ती संख्या पाच असून बालाजीनगर येथील दोन, डिग्गी रोड एक, शहरातील अन्य एक व गुंजोटी येथील एका व्यक्तीचा त्यात समावेश आहे, अशी माहिती नोडल ऑफिसर डॉ. पंडीत पुरी यांनी सांगितली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Osmanabad News about corona