तेलंगणाच्या लोकांसाठी केली जातेय जेवणाची व्यवस्था

 उमरगा : औद्योगिक वसाहत परिसरात चुलीवर स्वयंपाक करणारी महिला.
उमरगा : औद्योगिक वसाहत परिसरात चुलीवर स्वयंपाक करणारी महिला.

उमरगा (जि. उस्मानाबाद) : लॉकडाऊनमुळे मुंबईहून गावाकडे परतणाऱ्या तेलंगणा राज्यातील मजुरांच्या कुटुंबातील ४७० लोकांचा प्रवास ब्रेकडाऊन झाला. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांचा औद्योगिक वसाहतीत मुक्काम आहे.

महसूल प्रशासनाने त्यांच्या दोनवेळच्या जेवणाची सोय केली आहे. दरम्यान, प्रशासनाच्या मदतीला दानशूर व्यक्ती व संघटनांचीही काही मदत होत आहे. मजूर तेलंगणाचे असले तरी त्यांना सांबर-भाताशिवाय ज्वारीच्या भाकरीची चव चाखता यावी. प्रशासनाकडून या सर्व बाबी शक्य नसल्याने तीन दिवसांपूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव यांनी शंभर किलो ज्वारीचे पीठ दिले आणि महिलांनी दगडाची चूल मांडून जळणफाटा जमा करून भाकरी तयार करताहेत. 
उमरगा तालुक्यातील कसग

 गावाजवळील कर्नाटक सीमेवर मुंबईवरून तेलंगणा राज्यातील नारायणपेठ जिल्ह्याकडे परतणाऱ्या मजुरांचे टेंपो कर्नाटक पोलिसांनी शुक्रवारी (ता. २७) रात्री रोखले होते. कर्नाटक व तेलंगणा प्रशासनाकडे दोन दिवस संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नसल्याने मजुरांना पाठविण्याचा मार्ग बंद झाला. दोन दिवस कसगी ग्रामपंचायत, त्यानंतर उमरगा औद्योगिक वसाहतीत विजय जाधव, अब्दुल सत्तार राजेसाहेब कारचे यांच्या गोदामामध्ये दोन दिवस त्यांच्याकडून राहण्याची, जेवणाची सोय करण्यात आली.

दरम्यान, महसूल प्रशासनाने जबाबदारी घेत उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तहसीलदार संजय पवार यांनी त्या मजुरांना दररोज जेवणाची सोय करण्याचे नियोजन केले. हे नियोजन गेल्या बारा दिवसांपासून सुरूच आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक माधवराव गुंडिले, सहायक पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, अमोल मालुसुरे, विजयकुमार वाघ यांच्यासह कर्मचारी त्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी कार्यरत आहेत. आरोग्य पथक त्यांच्यासाठी तयार ठेवण्यात आले आहे. 
हेही वाचा : द्राक्षे लगडली; पण...
...अन् पेटल्या चुली! 
प्रशासनाने दोनवेळा सांबर-भाताच्या जेवणाची सोय केली. त्यात कसलीही कसूर आणू दिली नाही. मात्र जेवणात महाराष्ट्रीयन ज्वारीच्या भाकरीची आवड या मजुरांच्या कुटुंबांना आहे. काहीजण यासाठी पर्याय शोधत होते मात्र सर्वांना ते शक्य नव्हते. प्राचार्य डॉ. जाधव यांनी तीन दिवसांपूर्वी शंभर किलो ज्वारीचे पीठ दिल्यानंतर बऱ्याच कुटुंबातील महिलांनी रात्रीच्या जेवणासाठी दगडाच्या चुली केल्या. फरशीच्या तुकड्याला परात केली अणि ज्वारीच्या भाकरी केल्या जाऊ लागल्या. 

मजुरांच्या कुटुंबावर लॉकडाऊनमुळे कठीण प्रसंग आल्याने त्यांना सामाजिक भावनेतून औद्योगिक वसाहतीतील प्लॅन्टमध्ये आश्रय दिला. दररोज त्यांच्या जेवणाच्या नियोजनासाठी थांबावे लागते. प्रशासनाकडून मजुरांच्या जेवणाची सोय केली जाते. अधिकारी वेळोवेळी भेटी देतात. बहुतांश लोकांना जेवणात ज्वारीच्या भाकरीची चव हवी आहे. दानशूर व्यक्ती अथवा सामाजिक संघटनेने ज्वारीच्या पिठाची सोय केली तर चांगले होईल. 

- विजय जाधव, सामाजिक कार्यकर्ते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com