तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर अपघात,तेल सांडल्याने वाहतूक बंद | Osmanabad Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tuljapur Accident
तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर अपघात,तेल सांडल्याने वाहतूक बंद

तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर अपघात,तेल सांडल्याने वाहतूक बंद

sakal_logo
By
जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर कच्चे तेल घेऊन जाणाऱ्या टँकरने कारखान्यास जाणाऱ्या ऊसाच्या ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. या अपघातात टँकरमधील कच्चे तेल रस्त्यावर सांडून दोन तास वाहतूक बुधवारी (ता.२४) सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत बंद होती. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार गुजरातकडून (Gujrat) सोलापूरकडे कच्चे तेल घेऊन जाणारा टँकरने ट्रॅक्टरला जोराची धडक दिली. त्यामध्ये ऊसाच्या ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले. तसेच सोलापूरकडे जाणारा टँकर उजव्या बाजूस जाऊन धडकला. त्यामुळे टँकर रस्त्यावर (Osmanabad Accident Updates) पडला. टँकरमधील सर्व तेल रस्त्यावर पडले. त्यामुळे टँकरचे ही नुकसान झाले. टँकरचालक जखमी झाला असून त्यास उपचारासाठी सोलापूर (Solapur) येथे नेण्यात आलेले आहे. तुळजापूर नगरपालिकेचा (Tuljapur) अग्निशामक बंब घटनास्थळी जाऊन तेल पडलेले टँकरचा रस्ता स्वच्छ करण्याचे काम चालू आहे.

हेही वाचा: Aurangabad : औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर अपघात; एक ठार,तिघे गंभीर

सदरचा ट्रॅक्टर कंचेश्वर शुगरकडे माकडाचे उपळे येथील शेतकऱ्याचा ऊस गाळपासाठी घेऊन जात होता. घटनास्थळी तुळजापूरचे फौजदार श्री चनशेट्टी तसेच पोलीस कर्मचारी दाखल झालेले आहेत. टँकर चालकाचे नाव समजू शकले नाही.

प्रवाशांकडून नाराजी

सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग होऊन ही अशा प्रकारे अपघात झाल्याने उपस्थित प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर वाहतुक सुरळीतपणे सुरू झाली आहे.

तुळजापूरकडून येणाऱ्या टँकरने धडक दिली. त्यामुळे अपघात झालेले आहे. उपळे माकडाचे तालुका उस्मानाबाद येथील शेतकऱ्याचा ऊस आम्ही ट्रॅक्टरमधून कंचेश्वर कारखान्याकडे घेऊन जात होतो.

- बालाजी आडे, ट्रॅक्टरचे मालक, औसा (जि.लातूर)

loading image
go to top