उस्मानाबाद : एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक, २३ जणांचे स्वॅब घेतले

file photo
file photo

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील तीन जणांना कोरोनाची लागन झाल्याने त्यांच्या संपर्कातील जवळपास २३ नागरिकांचे स्वॅब नमुने घेण्यात येत आहे. त्यातील आठ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, कोरोनाबाधीत तीनपैकी एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास सोलापुरला हलविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.

जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाचे चार रुग्ण सापडले आहेत. गुरुवारी (ता. १५) सायंकाळी कळंब तालुक्यातील तीन रुग्ण आढळले आहेत. यात मुंबईहून परतलेल्या एका दाम्पत्याचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र सोमवारी (ता. ११) परंडा तालुक्यातील एका युवकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. हा युवक मुंबई, पुणे शहरातून प्रवास करुन परतला होता. त्यानंतर गुरुवारी (ता. १४) आणखी तीन जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने जिल्ह्यात रुग्णांची संख्या चारवर गेल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, गुरुवारपर्यंत दोन हजार ८६१ एवढ्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यातील ९७३ जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे, तर उर्वरित एक हजार ८८८ नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर २६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहेत. आत्तापर्यंत ६३३ नागरिकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आणखी ३२ जणांचे अहवाल अद्याप मिळालेले नाही.

सुरवातीला दोन व तीन एप्रिल रोजी उमरगा तालुक्यातील तीन रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते. त्यांना उपचारानंतर सोडून देण्यात आले होते. त्यानंतर तब्बल ३८ दिवसापर्यंत जिल्ह्यात एकही रुग्ण आढळलेला नव्हता. आता मात्र परंडा तालुक्यातील एक तर कळंब तालुक्यातील तीन रुग्ण पॉझीटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

त्यातील कळंब तालुक्यातील एकाची प्रकृती अधिक गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यास सोलापुरला हलविण्यात आले आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती घेण्याचे काम सुरु आहे. पहिल्या टप्प्यात अत्यंत जवळच्या संपर्कातील आठ लोकांचे स्वॅब घेण्यात आले असून, ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आणखी काही जणांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गलांडे यांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com