esakal | उस्मानाबाद: जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्याची वसुली मोहिम?
sakal

बोलून बातमी शोधा

osmanabad

उस्मानाबाद: जिल्हा परिषदेत पदाधिकाऱ्याची वसुली मोहिम?

sakal_logo
By
सयाजी शेळके :

उस्मानाबाद: 'आमची टर्म संपत आली आहे', म्हणून वसुलीची मोहिम राबविणाऱ्या एका पदाधिकाऱ्याची जिल्हा परिषदेच्या आवारात चांगलीच चर्चा होत आहे. संबंधीत पदाधिकारी ती, का, तो? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. चव सोडून दिली राव असे म्हणत काही कर्मचारी याप्रकाराने चांगलेच बेजार झाले आहेत. तरी काही कर्मचारी याची चवीने चर्चा करीत आहेत.

हेही वाचा: पुण्याच्या पोलिसांकडून आठ लाखाचा गुटखा जप्त

जिल्हा परिषद गटामध्ये विविध विकास कामे करण्याचा प्रयत्न निवडूण आलेले सर्वच सदस्य करतात. सध्याच्या पंचवार्षिक निडवणुकीची टर्म संपत आहे. अगदी सहा महिन्याचा कालावधी राहिला आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला निवडणुका होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे यातील काही सदस्य सध्या स्वतःची 'थेट वसुली' मोहिम राबवित असल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेच्या इमारतीत चांगलीच रंगत आहे.

प्रत्येक विभागातील अधिकारी, कर्मचारी यांना टेबलला बोलवणे. त्याची काही चूक असेल तर त्याची झाडाझडती घेणे. त्याच्याकडून स्वःहिताची कामे करून घेतली जातात. जेव्हा एखादा कर्मचारी, अधिकारी याच्या काहीच चुका दिसून येत नाहीत. अशा वेळी त्या अधिकारी, कर्मचाऱ्याच्या समोर गाऱ्हाने सुरू होते.

'आमची टर्म संपत आली आहे. आम्हाला काहीतरी मदत करा' असे म्हणत थेट वसुलीची मागणी करीत आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचारीही चांगलेच बुचकूळ्यात पडत आहे. दरम्यान कामांच्या यादीमध्येही या सदस्याकडून हेराफेरी करण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे वरीष्ठ नेत्याकडूनही या सदस्याला चांगलाच शाब्दीक 'प्रसाद' मिळत आहे. तरीही स्वतःचा 'वसुलीचा' हेका मात्र सुटत नसल्याचे कर्चमारी दबक्या आवाजात सांगत आहेत.

आम्हालाच नाही, अन आम्ही काय द्यावं

दरम्यान काही विभागातील कर्मचारी, अधिकारी प्रामाणिकपणे काम करतात. त्यांच्याकडेही हे सदस्य मागणी करतात. 'मग, काय आहे का नाही? आमची टर्म संपत आहे. पुन्हा काय आम्ही येणार आहोत का? आमच्याकडेही बघा' असे म्हणत अधिकारी, कर्मचारी यांच्यासमोर आपले तुणतुणे वाजवत आहेत. 'कुठे नादी लागायचे' म्हणत काहीजण टोकन देतही आहेत. काहीवेळा स्वतः बोलण्याच्याऐवजी हस्ते-परहस्ते निरोप पोहचविला जात आहे.

विशेष म्हणजे पती आणि पत्नी मिळून असा प्रकार करीत असल्याने नेमका हा सदस्य 'ती, का, तो' याची चर्चा जिल्हा परिषदेच्या आवारात होत आहे. याबाबत आम्ही काही कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितले. 'साहेब आम्हालाच काही नाही, आम्ही प्रामाणिकपणे काम करतोत. अन मग याची कोठून भरती करायची'. बर यांचे नेहमीचेच आहे.

पण, आता जरा जास्तच झालाय. कालावधी संपत येत असल्याने 'वरबडून' घेऊन जाण्याचा प्रकार असल्याचे त्या कर्मचाऱ्याने सांगितले. उर्वरीत सहा महिन्याच्या काळात या वसुलीवाल्याची मोहिम कशी राबते, याकडे आम्ही थोडे लक्ष देतोत.

loading image
go to top