esakal | पुण्याच्या पोलिसांकडून आठ लाखाचा गुटखा जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्याच्या गुन्ह्यात उदगीरातील एकास अटक

पुण्याच्या पोलिसांकडून आठ लाखाचा गुटखा जप्त

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर : उदगीरहुन पुण्यात गेलेल्या एका ट्रॅव्हल्समधून गुटखा जप्त करण्यात आला. तेथे पकडलेल्या आरोपींच्या सांगण्यावरून येथील मॉडर्न जर्दा स्टोअर्सच्या मालकास शनिवारी (११) पुण्याच्या पोलिसांनी अटक करून घेऊन गेले पुन्हा मंगळवारी (ता.१४) पुणे पोलिसांनी मॉडर्न जर्दा स्टोअर येथे छापा टाकून साडेचार लाख रुपये रोख व तीन लाख ४७ हजार रुपयाचा गुटखा जप्त केला आहे.

पुणे येथे सातत्यानं गुटख्याची विक्री वाढल्याने हा गुटखा नेमका येतो कुठून? हा प्रश्न पुन्हा पोलिसांना पडला असावा त्या दृष्टिकोनातून त्यांनी उदगीर लातूर या भागातील पुण्यात येणाऱ्या ट्रॅव्हल्सकडे लक्ष केंद्रित केले होते. त्या दरम्यान सात सप्टेंबरला उदगीरऊन आलेल्या ट्रॅव्हल्स मधून पिंपरी-चिंचवड येथील वाकड पोलीस ठाण्याच्या पथकाने मलिकार्जुन पाटील (वय-२४) यांचा दोन बॉक्स गुटखा पकडला. रहाटणी पुणे येथील त्याच्या घराची झडती घेतली असता एक लाख ३३ हजार रुपयाचा गुटखा सापडला. वाकड पोलिस ठाण्याचे पोलिस तुषार शेटे यांच्या फिर्यादीवरून आरोपी पाटील, येथील गुटखा दुकानदार सय्यद खुर्शिद अहमद साबेरी (वय-५२) व मनोज बाणेर यांच्याविरुद्ध गुटखा प्रतिबंधक विक्री व साठवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: धारावीच्या जान मोहम्मदचे 'दाऊद'शी जुने संबंध - ATS प्रमुख

त्या अनुषंगाने पोलिस कोठडीत असलेल्या पाटील या आरोपीच्या जळगाव वरून उदगीर येथील गुटखा दुकानदार साबेरी यास पुणे पोलिसांनी शनिवारी (ता.११) उदगीर येथून अटक करून घेऊन गेले. परत मंगळवारी (ता.१४) पुणे पोलिसांनी येथील मॉडर्न जरदा स्टोअर्स वर धाड टाकून साडेचार लाख रुपये रोख व तीन लाख ४७ हजार आचा गुटखा जप्त केला असल्याची माहिती तपास अधिकारी तथा वाकड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक मक्सुद मणेर यानी दिली आहे.

तब्बल ८ तास कसुन चौकशी

येथील मॉडर्न जर्दा स्टोअर्स दुकानदाराने आपल्या जवाबामध्ये नमूद केल्याने पुणे पोलिसांनी मंगळवारी अचानक धाड टाकून दुकानाचे झाडाझडती घेतली व तपासणी करुन पंचनामा केला. तब्बल ६ ते ७ तास दुकान बंद करुन दुकानाची तपासणी करण्यात आली आहे.यावेळी ७ लाख ९७ हजार रुपयाचा मुद्देमाल आढळुन आला. रात्री दहाच्या सुमारास येथील शहर पोलीस स्टेशनला याबाबतची नोंदणी करून पुणे पोलीस रवाना झाले असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक श्री मणेर यांनी दिली.

याकामी पुण्याचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत दिसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ.विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मक्सुद मणेर, पोलीस हवालदार ए.ए. काळे, पो.ह. डी.पी. साबळे, पो.ना. ए.एस. शेख, उदगीर शहरचे गजानन पुल्लेवाड, महिला पोलीस स्वाती कोलारे आदींनी पुढाकार घेतला.

हेही वाचा: दाभोलकर हत्या प्रकरण : दोषारोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण

अन्न भेसळ प्रशासन करते काय?

लातूरचे अन्न व भेसळ प्रशासन महिन्यातून अनेक वेळा उदगीर दौऱ्यावर असते मग हे प्रशासन नेमकं करते काय एवढा मोठा गुटख्याचा बाजार उदगीर शहरात भरत असताना याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते काय? पोलीस प्रशासन नेमके काय करते? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं शहरात उपस्थित केले जात आहेत.

loading image
go to top