विद्यार्थिनीने जपली सामाजिक बांधिलकी

कळंब : गरजूंना वाटप करण्यासाठी तयार केलेले शंभर मास्क नायब तहसीलदार परवीन पठाण यांच्याकडे देताना वैष्णवी मोरे.
कळंब : गरजूंना वाटप करण्यासाठी तयार केलेले शंभर मास्क नायब तहसीलदार परवीन पठाण यांच्याकडे देताना वैष्णवी मोरे.
Updated on

कळंब (जि. उस्मानाबाद) : लातूर येथील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतनमध्ये ड्रेस डिझायनिंग अँड गारमेंट मॅन्युफॅक्‍चरिंग कोर्सचे प्रशिक्षण घेणाऱ्या शहरातील वैष्णवी विक्रम मोरे हिने लॉकडाउन काळामध्ये हजारो मास्क तयार करीत रुग्णालय, पोलिस ठाणे आदी ठिकाणी मोफत वाटप करीत सामाजिक बांधिलकी जपली आहे. नुकतेच तिने गरजूंना वाटप करण्यासाठी नायब तहसीलदार परवीन पठाण यांच्याकडे शंभर मास्क सुपूर्द केले आहेत.

वैष्णवी मोरे हिने आतापर्यंत सुमारे दहा हजार मास्क तयार केले आहेत. त्यापैकी एक हजार मास्क सामाजिक भावनेतून वेगवेगळ्या संस्था व गरजूंना मोफत वितरित केले आहेत.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

लॉकडाउनच्या दोन दिवसांपूर्वी शिक्षिका श्रीमती यादव यांनी मास्क बनविण्याचे प्रात्यक्षिक घेतले होते. वैष्णवीने लॉकडाउननंतर गरजूंसाठी मास्क बनविण्याचा निर्धार करीत तत्काळ सुरवातही केली.

आजपर्यंत तिने तिची भाची आस्था मोरे हिच्या वाढदिवसानिमित्त दोनशे मास्क तयार करीत वाटप केले; तसेच कळंब उपजिल्हा रुग्णालयात दोनशे, तर तहसील कार्यालय, पोलिस ठाणे, कळंब पत्रकार संघ, रोटरी क्लब, गणपतराव कथले युवक आघाडी, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांतही प्रत्येकी शंभर मास्कचे मोफत वाटप केले आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

तर उर्वरित मास्कची अतिशय अल्पदरामध्ये विक्री केली. 
कोरोनामुळे उद्‌भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी तिने हे सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी मास्कचे वाटप करीत सामाजिक बांधिलकी जपली आहे. या कामात तिला बहीण विशाखा, आई कल्पना, भाची आस्था, भाऊ आर्यन व परमेश्वर, तसेच प्रा. डॉ. किशोर मोरे, परमेश्वर मोरे यांचीही मदत मिळाली.

वैष्णवीचे या सेवाभावी कामाबद्दल उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे. के. वायदंडे, नायब तहसीलदार परवीन पठाण, शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतनचे (लातूर) प्राचार्य डॉ. ए. एम. आगरकर, सावित्रीबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक श्रीधर भवर, पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे, ज्ञानेश्वर पतंगे, रोटरी क्लबचे अध्यक्ष हर्षद अंबुरे यांनी कौतुक केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Deputy Collector Eknath Bangale inspected seized illegal sand stock and reviewed security, distribution, and e-auction plans in Gangapur taluka
The Education Department appointed two teachers at Sayyadpur ZP School after villagers protested against the shortage of teaching staff.
Progressive farmer Govardhan Ugle received the Maharashtra Krushibhushan Award for outstanding achievements in organic farming.
Food Safety Department inspection alerts triggered shop closures amid concerns over gutkha sales and loose edible oil distribution.
Marathi News Esakal
www.esakal.com