
उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठ गावांना नऊ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये सर्वाधिक सहा गावे परंडा तालुक्यातील आहेत. याशिवाय १३ गावांना पाणीपुरवठ्यासाठी १८ कूपनलिका व विहिरींच्या अधिग्रहणांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याद्वारे संबंधित गावांना पाणीपुरवठा सुरू आहे.
उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने काही गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवण्यास सुरवात झाली आहे. गावाला पाणीपुरवठा करणारे सार्वजनिक स्रोत कोरडे पडत चालल्याने टँकर, अधिग्रहणाच्या मागणीचे प्रस्ताव प्रशासनाकडे येत आहेत.
सद्य:स्थितीत जिल्ह्यातील आठ गावांना पाणीपुरवठ्यासाठी नऊ टँकर मंजूर करण्यात आले असून, या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असलेली सर्वाधिक गावे सहा गावे परंडा तालुक्यातील आहेत. यामध्ये कात्राबाद, वडनेर, खासगाव, टाकळी, ढगपिंपरी, मुगाव-शिरगीरवाडी, उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा, उस्मानाबाद तालुक्यातील कोळेवाडी या गावांचा समावेश आहे. या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी नऊ कूपनलिका व विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहेत.
मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा
सध्या या आठ गावांतील ११ हजार ९७ लोकसंख्येची तहान टँकरच्या पाण्यावरच अवलंबून आहे. या आठही गावांसाठी टँकरच्या २० खेपा मंजूर आहेत. याशिवाय जिल्ह्यातील १३ गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी १८ कूपनलिका व विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने काही गावांतील ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. अशा गावांकडून आता अधिग्रहण किंवा टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, या मागणीचे प्रस्ताव संबंधित पंचायत समित्यांकडे दाखल केले जात आहेत.
दरम्यान, उन्हाच्या तीव्रतेमुळे विविध ठिकाणच्या प्रकल्पांतील पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत चालली आहे. जिल्ह्यातील एक मोठा, १७ मध्यम आणि २०५ लघुप्रकल्प मिळून एकूण २२३ प्रकल्पांमध्ये सध्या ११.९६ टक्के पाणीसाठा आहे. २२ लघुप्रकल्प कोरडे पडले आहेत. ७३ प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली आहे, तर ७९ प्रकल्पांमधील पाणीसाठा २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.