Market Committee : ...तर लायसन्स रद्द करणार; वैजापुरात अडत व्यापाऱ्यांना ‘अल्टिमेटम’

market committee
market committeeesakal

वैजापूर : बाजार समितीचे भुसार व कांदा लिलावात शेतमाल खरेदी करण्यासाठी कायम टाळाटाळ करणाऱ्या नोंदणीकृत अडत व्यापारी महिनाभरात खरेदी व्यवहारात सहभागी न झाल्यास त्यांचे लायसन्स रद्द करून अनामत रक्कम जप्त करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता.२) संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

market committee
Mumbai : राखीव अधिवासातील जमिनीच्या भरपाईपोटी त्याच क्षेत्रात जमीन द्यावी लागणार

तसेच शेतीमाल विक्री केलेल्या शेतकऱ्यांना २४ तासांत पैसे देणे, कांदा खरेदी केंद्रातील वजन काट्यावर मोजमापाचे पैसे आकारण्यासाठी कर्मचाऱ्याच्या फोन पे स्कॅनरची चौकशी करण्याचा ठराव संमत करण्यात आला.

बाजार समिती निवडणुकीनंतर सभापती रामहरी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळांची पहिली मासिक बैठक पार पडली. उपसभापती शिवकन्या मधुकर पवार, अनिता देविदास वाणी, काकासाहेब पाटील, अविनाश गलांडे, कल्याण दांगोडे, ज्ञानेश्वर जगताप, उल्हास ठोंबरे, प्रशांत सदाफळ, शेख रियाज, कल्याण जगताप, गणेश इंगळे, प्रशांत त्रिभुवन, प्रवीण पवार, गोरख आहेर, रजनीकांत नजन, बद्रीनाथ गायकवाड, सचिव प्रल्हाद मोटे यांची उपस्थिती होती.

यावेळी समितीतील प्रशासकीय दुर्लक्षामुळे व्यापाऱ्यांकडून मार्केट फीस आकारली जात नसल्यामुळे समितीचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी व्यापाऱ्याकडून त्यांच्या बॅंक खात्याचे स्टेटमेंट मागवून त्यांची तपासणी करण्याची मागणी प्रशांत सदाफळ यांनी केली.

market committee
Baby Ariha : जर्मनीत अडकलेली बेबी अरिहा लवकरच भारतात परतेल! परराष्ट्र मंत्रालयाचं आश्वासन

मार्केट कमिटीच्या सेल हॉलमध्ये धान्य खरेदी केल्यानंतर व्यापारी त्या ठिकाणाहून धान्याची उचल करत नसल्यामुळे येथे शेतकऱ्यांना लिलावासाठी धान्य ठेवण्यासाठी अडचण होत असल्याचा मुद्दा संचालक गोरख आहेर व प्रवीण पवार यांनी उपस्थित करून भुसार धान्य व्यापाऱ्यांना लिलाव झाल्यावर सेल हॉलमधून खरेदी केलेले धान्य हलवण्याचा ठराव करण्यात आला.

चौकशीचा ठराव

बैठकीत अनित वाणी, ज्ञानेश्वर जगताप यांनी ६९ लाखांचा निधी खर्च करून बाजार समिती आवारात उभारलेले अद्ययावत ‘धान्य चाळणा केंद्र’ सुरू करण्यासाठी विलंब का झाला, असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर सभापती जाधव यांनी लवकरच केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करू असे सांगितले.

वजनकाट्यावर मोजमाप शुल्क आकारण्यासाठी बाजार समिती प्रशासनाची परवानगी न घेता एका कर्मचाऱ्यानी या ठिकाणी परस्पर त्यांच्या नावाचे फोन पे स्कॅनर पैसे घेण्यासाठी लावल्याचा प्रकार संचालक गणेश इंगळे, प्रशांत त्रिभुवन यांनी सभागृहात उघड केला. सचिव मोटे यांनी स्कॅनर बसवल्याचे माहिती नव्हते असे सांगितल्यानंतर संचालकांनी सचिवांनी या विषयावर चांगलेच धारेवर धरून या प्रकाराची सविस्तर चौकशी करण्याचा ठराव बहुमताने संमत केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com