Education News: वसमत जवाहर नवोदय विद्यालयातील हलाखीच्या सुविधांवर पालक संतप्त; १०० हून अधिकांनी घेतली सामूहिक टीसीची मागणी
Basmat News: वसमत येथील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना निकृष्ट अन्न व अस्वच्छ परिसरामुळे जीविताचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर १०० पेक्षा अधिक पालकांनी सामूहिक टीसी मागणीचा अर्ज प्रशासनाकडे दिला आहे.
वसमत : येथील जवाहर नवोदय विद्यालयातील सोयी सुविधांचा अभाव तसेच निकृष्ट दर्जाच) चा आहार दिला जात असल्याचा आरोप करत शंभरहून अधिक पालकांनी सामूहिक टीसी काढून घेण्यासाठी अर्ज केल्याने खळबळ उडाली आहे.