
esakal
-भास्कर सोळंके
गेवराई: जायकवाडीच्या धरणातून आज रविवार पासून तब्बल सव्वा दोन लाखांहून आधिक क्युसेकने गोदावरी नदीच्या पात्रातुन पाणी विसर्ग होत असल्याने गेवराईच्या नदीच्या काठावरील गावांना पूरपरिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.१९ वर्षात गोदावरीला महापूर येण्याची ही तिसरी वेळ आहे.गोदावरी काठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यास प्रशासन अलर्ट झालेले असून,स्थलांतरित करण्यात प्रारंभ केला आहे.