
नांदेड : जिल्ह्यात ‘क्यार’ व ‘महा’चक्री वादळाच्या तडाख्याने उद्भवलेल्या अतिवृष्टीत खरिपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्या वेळी शासनाच्या निर्देशानुसार कृषी, महसूल, जिल्हा परिषद व विमा कंपनीच्या प्रतिनिधींकडून संयुक्त पंचनामा करण्यात आला होता. यात जिल्ह्यातील विमा भरलेल्या चार लाख ६० हजार ६९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने विमा कंपनीला सादर आहे.
‘क्यार’ व ‘महा’चक्री वादळाचा तडाखा
‘क्यार’ व ‘महा’चक्री वादळामुळे जिल्ह्यातील कोरडवाहू, बागायती व बहुवार्षिक अशा एकूण सहा लाख ४८ हजार ३१६ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. यात बाधित सात लाख १८ हजार ४३६ शेतकऱ्यांना फटका बसला होता. शासनाकडून विमा कंपनीचा प्रतिनिधी, कृषी सहायक, ग्रामसेवक तसेच तलाठ्यांना संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यानुसार करण्यात आलेल्या संयुक्त पंचनाम्यात जिल्ह्यातील सात लाख ७३ हजार २१३ शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तूर, कापूस व ज्वारी असे एकूण सहा लाख ६० हजार ६९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल विमा कंपनीला कृषी विभागाने पाठविला आहे.
हेही वाचा....मराठवाड्यात नांदेडचा डंका......कशात ते वाचायला हवे
सोयाबीनचे सर्वाधीक नुकसान
या अतिवृष्टीत सोयाबीनचे तीन लाख ९२ हजार ३८८ हेक्टर, तूर आठ हजार २८ हेक्टर, कापूस ३९ हजार ३२६ हेक्टर, तर ज्वारी २० हजार ९४७ हेक्टरचा समावेश आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी कृषी विभागाने हा अहवाल सादर केला आहे. तो कंपनी स्तरावर प्रलंबित आहे. दरम्यान, अतिवृष्टीच्या काळात उडीद तसेच मुगाच्या पिकाची काढणी झाल्यामुळे या पिकांच्या नुकसानीचा समावेश यात आला नाही.
हेही वाचलेच पाहिजे....नांदेडात थरार...पिस्तुल रोखून ३० लाख लंपास
तालुकानिहाय नुकसानीचे क्षेत्र
(क्षेत्र हेक्टरमध्ये)
नांदेड - २०,२५०, अर्धापूर - १५.५२२, मुदखेड - १५.७५८, कंधार - ४४,३९९, लोहा - ५६,६५३, नायगाव - ३२,७४३, देगलूर - ३८.१६१, मुखेड ५१,७२४, बिलोली - २६,१५२, किनवट - १२,२८४, धर्माबाद - १५,५३०, माहूर - १२,६४०, हदगाव - ६२,३०३, हिमायतनगर - १५,५५१, भोकर - २१,५२८ व उमरी - १८, ४८२.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सहा लाख साठ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल विमा कंपनीला सादर केला. यात सर्वाधिक सोयाबीनचे तीन लाख ९२ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.