तीन एकरातील ऊस जळून खाक, फडात ऊसतोड सुरू असल्याने कामगारांची धावपळ

अविनाश काळे
Thursday, 17 December 2020

उमरगा शहरालगतच असलेल्या उसाचा फडाला मुख्य वीज वाहिनीच्या ठिणण्या पडून जवळपास तीन एकर ऊस खाक झाला.

उमरगा (जि.उस्मानाबाद) : शहरालगतच असलेल्या उसाचा फडाला मुख्य वीज वाहिनीच्या ठिणण्या पडून जवळपास तीन एकर ऊस खाक झाला. ही घटना गुरुवारी (ता. १७) दुपारी घडली. दरम्यान, याच फडात ऊसतोड सुरू असल्याने कामगारांची धावपळ झाली. मात्र, कुणालाही कसलीही दुखापत झाली नाही. याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, शहरालगत असलेल्या रतन अशोकराव पाटील यांचे सहा एकर क्षेत्रात ऊस आहे.

 

 

तोडीला उशीर झाल्याने ऊस वाळलेल्या स्थितीत होता. दोन दिवसापूर्वी ऊस तोड सुरू झाली आहे. गुरुवारी दुपारी अचानकपणे मुख्य वीज वाहिनीच्या ठिणण्या पडून जवळपास तीन एकर ऊस खाक झाला. यावेळी कामगार याच फडात दुसऱ्या बाजूने ऊस तोड करीत होते. आगीचा दृश्य दिसताच सर्वांनी फडाच्या बाहेर आले. दरम्यान जवळपास तीन एकर ऊस जळाल्याने तीन ते चार लाखाचे नुकसान झाले.

 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Over Three Acre Sugarcane Burned Umarga