esakal | लातुरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा; भाजपतर्फे आंदोलनाचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Covid 19

लातुरमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा; भाजपतर्फे आंदोलनाचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर: लातूर जिल्ह्यात कोरोना आजाराचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. शासकीय वगळता सर्वच खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे. यात रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. बऱ्याच कोरोना रुग्णांना उपचाराच्या वेळीच सुविधा मिळत नसल्याने रुग्णांच्या नातेवाईकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शासन आणि प्रशासन यांनी याबाबत गंभीरपणे दखल घेऊन कोरोना रुग्णांची हेळसांड थांबवावी. चार दिवसात सुधारणा झाली नाही तर लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टी रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड, आमदार अभिमन्यू पवार आणि शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे यांनी जिल्हाधिकारी यांना एका निवेदनाद्वारे दिला आहे.

हेही वाचा: उस्मानाबादमध्ये कडक लॉकडाउन? वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढली

लातूर जिल्ह्यामध्ये कोविड-19 च्या वाढत्या प्रादूर्भावामुळे ऑक्सिजन बेड तसेच व्हेंटीलेटर बेडची वाढती गरज पहाता भयावह परिस्थिती दिसून येत आहे. ऑक्सिजन, व्हेंटीलेटर बेड तसेच रेमडेसिव्हिर इंजेक्शन रुग्णास उपलब्ध होत नसल्याने फार मोठी जीवीत हानी होत आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये खुप मोठे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. लातूर शहर हे जिल्हयाचे ठिकाण असल्याने संपूर्ण जिल्हायातून कोरोना रुग्ण उपचारासाठी लातूर शहरात दाखल होत आहेत.

हेही वाचा: Coronavirus| व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून उपलब्ध केले जाताहेत डॉक्टर

लातूर शहरात शासकीय वगळता जवळपास सर्वच खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णाच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत वेळोवेळी कळवूनही प्रशासन गंभीरतेने घेत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी याबाबत लक्ष देऊन सुधारणा करणे गरजेचे आहे, असं मतही भाजपने मांडलं