

Son Kills Father Over Argument, Later Buries Body At Home
Sakal
पाचोड : दारुच्या आहारी गेलेल्या पोटच्या मुलाने जन्मदात्या पित्याचा खून करून त्याचा मृतदेह राहत्या घरात पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची हृदयद्रावक घटना कडेठाण (ता.पैठण) येथे शनिवारी (ता. २२) उघडकीस आली असून पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी खूनी मुलास ताब्यात घेतले. यासंबंधी अधिक माहिती अशी,कडेठाण (ता.पैठण) येथील कल्याण बाबुराव काळे (वय ६८) यांस रामेश्वर काळे (वय २८ वर्षे) लक्ष्मण काळे (वय २२) हे दोन अविवाहीत मुले, एक विवाहीत मुलगी व पत्नी सुमनबाई (वय ६२ वर्ष) असे छोटेसे कुटूंब काबाडकष्ट करून उपाजिविका भागवित असत.