

Fraudsters Pose as Police Officers to Rob Gold Ornaments Near Pachod
पाचोड : "पुढे रस्त्यावर चोरी झाली असून त्यांचे दाग - दागिने चोरीला गेले, त्याची तपासणी करावयाची" असल्याची बतावणी करून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या कोळी शिरसगाव (ता.पैठण) येथील जाधवर दांपत्यास रस्त्यात थांबवून त्यांचे अंगावरील सोन्याची अंगठी, पोत,मणी- मंगळसुत्र ठगबाज चोरट्यांनी लुटून नेल्याची घटना मंगळवारी (ता.१३) भर दुपारी दीड वाजेच्या सुमारास धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड (ता.पैठण) जवळील सुंदरम जिनिंगजवळ घडली.