

Police Crackdown: Illegal Cattle Smuggling Racket Busted in Murma
Sakal
पाचोड : धुळे– सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा (ता. पैठण) शिवारात पाचोड (ता.पैठण) पोलिसांनी रविवारी (ता.२४) दुपारी सापळा रचून कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या एक पिकअप वाहन पकडले. यांत सहा गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली असून पिकअप वाहनासह एकूण चार लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसाकडून जप्त करण्यात आला.