

पाचोड : अवैधरित्या गुटखा साठवणूक करणाऱ्या एका तरुणाला पाचोड (ता. पैठण) येथे स्थानिक गुन्हे (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांनी अटक करून त्याचेकडून सहा लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची घटना मंगळवारी (ता.२३) घडली असून अलमास युनूस बागवान, (वय २८वर्षे), रा.इस्लामपुरा, पाचोड, (ता.पैठण) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.