Pachod Rural Hospital : पाचोड ग्रामीण रुग्णालयाचे होणार ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन; आयुक्तांनी घेतला रुग्णसेवेचा आढावा

Pachod Rural Hospital Upgrade, 50 Bed Sub District Hospital : पैठण तालुक्यातील पाचोड ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आयुक्त संजय काटकर यांनी जागेची पाहणी करून रुग्णसेवेचा आढावा घेतला.
Pachod Rural Hospital Upgrade, 50 Bed Sub District Hospital

Pachod Rural Hospital Upgrade, 50 Bed Sub District Hospital

esakal

Updated on: 

पाचोड : पैठण तालुक्यातील पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे आयुक्त तथा संचालक संजय काटकर यांनी शुक्रवारी (ता. १३) पाचोड ग्रामीण रुग्णालय व ट्रॉमा केअर युनिटला भेट देऊन प्रस्तावित श्रेणी वर्धनासाठी आवश्यक असलेल्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांच्या या दौऱ्यामुळे रुग्णालयाच्या विस्ताराच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Loading content, please wait...