crime
माहूर - माहूर तालुक्यातील पाचोंदा येथे काल ता. २० रोजी शेतात कापूस वेचणीदरम्यान दोन सख्ख्या जावांचा गळा दाबून निर्घृण खून झाल्याच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना पोलिसांनी केवळ बारा तासांच्या आत अटक करण्यात यश मिळविले असून या जलदगती कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.