

Bidkin Highway Accident Leaves Suraj Erande Dead During Treatment After Serious Head Injury and Ambulance Delay
esakal
-रविंद्र गायकवाड
बिडकीन : पैठण–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील रमानगर, चितेगाव येथे अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने सूरज रंगनाथ एरंडे (वय ३२, रा. ७४ जळगाव, ता. पैठण) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत असताना शासकीय रुग्णवाहिकेसाठी तब्बल अर्धा तास प्रतीक्षा करावी लागल्याची माहिती समोर आली आहे. अखेर गुरुकृपा रुग्णवाहिका सेवेने जखमीला रुग्णालयात दाखल केले; मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे महामार्गावरील अपघात आणि आपत्कालीन आरोग्यसेवेच्या तत्परतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.