Political Buzz Over Accepted Members Selection
sakal
पैठण : नगर पालिका निवडणुकीत शिवसेनेने ऐतिहासिक यश संपादन केल्यानंतर आता सर्वांच्या नजरा उपनगराध्यक्ष निवड आणि स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीकडे लागल्या आहेत. सत्तेचे समीकरण स्पष्ट असले तरी, पदांच्या वाटपावरून शहरात राजकीय तर्क-वितर्काना उधाण आले असून, पक्षासाठी निष्ठेने लढलेल्या पराभुतांना संधी मिळणार की नव्या चेहऱ्यांची वर्णी लागणार? हा प्रश्न सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.