

Palodwadi Theft Case Four Masked Robbers Loot Cash and Gold Silver Jewellery Worth Rs 3 Point 32 Lakh in Night Raid
esakal
-राहुल पारवे
पालोद : तोंडाला रुमाल बांधून आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी शनिवारी (ता. २१) रात्री पालोदवाडी आणि लगतच्या शेतवस्तीवर धुमाकूळ घालत चार घरांना लक्ष्य केले. घरांची कडी-कुलपे तोडून, तर काही ठिकाणी दरवाजा उघडणाऱ्या महिलांच्या गळ्याला चाकू लावून धमकावत चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण तीन लाख ३२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. अवघ्या दीड तासांत घडलेल्या या घटनांमुळे पालोदवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.