Pankaja Munde
sakal
बदनापूर - 'कर्ज काढलं, उधार-उसनवारी केली, रक्ताचं पाणी करून पिकं जगविली. आता पावसानं दगा दिला अन् समदी पिकं खाक झाली. हातात धान्याचा एक दाणाही येणार नाही. पिकांसाठी केलेला सगळा खर्च वाया गेला. अशा परिस्थितीत आम्ही म्होरं जगायचं कसं?' असा हृदय पिळवटून टाकणारा सवाल करीत वयोवृद्ध शेतकरी रतन शेळके यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर दुष्काळाची व्यथा मांडली. भावना अनावर झालेल्या शेळके यांनी यावेळी हंबरडा फोडल्याने उपस्थितांचेही डोळे पाणावले.